रत्नागिरी, दि. ३१ :कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सततच्या पावसामुळे आंबा घाटातील काही ठिकाणी रस्त्याला तडे गेल्याचे निदर्शनास आले. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ पाहणी करत जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले. या निर्णयामुळे मालवाहतूक करणाऱ्या ट्रक आणि अन्य अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवायची की त्यावरही निर्बंध घालायचे, याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून रस्त्याची पाहणी सुरू असून, भेगांची दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने नागरिक आणि वाहनचालकांना आंबा घाटातून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे तसेच अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
(अधिक सविस्तर बातमी ..लवकरच देत आहोत.)








