तुतारीची गर्जना एव्हडी करुया आणि घड्याळाची टिकटिक संपयुया : माजी खासदार विनायक राऊत

देवरुख, दि. ०७ (प्रतिनिधी)::  मी चिपळुण, दसपटीपासुन, सावर्डे,  संगमेश्वर, देवरुख असा अभ्यास केलाय. आघाडीचे प्रशांत यादव यांचा विजय १००१ टक्के होणारच. घड्याळाची टिकटिक बंद पाडणारच आणि बंद पाडावीच लागेल. कारण या जिल्ह्यातील उद्योगमंत्री झाल्यावर सर्वच उद्योग गुजरातला पाठविण्याचे पाप यांनी केले. एकिकडे येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले असताना त्यांनी शक्तीपिठ महामार्ग करण्याचा प्रयत्न हा बांधकाम मंत्र्यांचे हित जपण्यासाठी सुरु आहे. परप्रांतिय भूमाफियांच्या घशात कोकण घालण्याचा या सरकारचा घाट सुरु आहे. म्हणुनच या सरकारला संपविण्यासाठी तुतारीची गर्जना एव्हडी करुया आणि घड्याळाची टिकटिक संपवुया आणि चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांना विजयी करुया असे प्रतिपादन उध्दवसेनेचे नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना संपविणारी औलाद देशात जन्माला यायचीय असाही ईशारा यावेळी त्यांनी दिला.
     महाविकास आघाडी संगमेश्वर तालुका आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बुधवारी सायंकाळी उशीरा देवरुखातील मराठा भवन येथे बोलत होते. पुढे श्री राऊत म्हणाले राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार, वाढलेली महागाई, या सरकारचा मुजोर पणा, गद्दारी संपविण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपण एकदिलाने प्रामाणिक काम करुन आघाडीच्या सर्वच जागा जिंकुया असे आवाहन माजी खासदार राऊत यांनी केले.
     यावेळी मधुकर भावे म्हणाले मी ८६ वर्षांचा म्हातारा आहे. पण हे सरकार घालविल्याशिवाय मी मरणार नाही. हि निवडणुक महाराष्ट्राचे भवितव्य घडविणारी आहे. सध्या शाहु, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे आहे. म्हणून चुकिच्या माणसांच्या हाती सत्ता देऊ नका. प्रशांत यादव यांच्या सारख्या तरुणांच्या पाठीशी ठाम उभे रहा. बघा वाशिष्टीचे नाव गंगानदी सारखे देशात पवित्र करतील असे भावे म्हणाले. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बने म्हणाले आम्ही कितीही केले तरी उध्दवसेने शिवाय विजय शक्य नाही. ते आम्हांला मोठ्या भावा सारखे आहेत. आम्ही तोच सन्मान त्यांना देऊ असे ते म्हणाले. राजेंद्र महाडिक म्हणाले या मेळाव्याला जो प्रतिसाद लाभला आहे तोच आपला विजय आहे. राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस आणि उमेदवार प्रशांत यादव म्हणाले मला उमेदवारी मिळण्यामध्ये व्यासपिठावरील सर्व आणि नेते मंडळींचा हात आहे. त्यांचा मी ऋणी आहे. माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. आपल्या उपस्थितीमुळे आपण विजयी होऊ हा विश्वास अजुन बळ देणार ठरला आहे. हि लढाई अस्तिवाची, स्वाभिमानाची आणि महाराष्ट्र वाचविण्याची आहे. जे गेले ते विकासासाठी नाही तर स्वार्थासाठी गेलेत. राज्य वाचविण्याची गरज आहे. आपण सर्व एक नंबर वर आहोत ते कायम एक नंबरवरच राहुन निश्चीतपणे विजयी होऊ असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके म्हणाले सभेचा उत्साह गर्दी पाहिली कि विजय आपलाच आहे यात काहीच शंका नाही असे म्हटले.
यावेळी व्यासपिठावर माजी राज्यमंत्री रविंद्र माने, आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव, माजी आमदार सुभाष बने, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, राष्ट्रवादी प्रदेशच्या डॉ. नलिनी भुवड, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, नेहा माने, क्षेत्राध्यक्ष दतात्रय लिंगायत, वेदा फडके, संतोष थेराडे, जया माने, उध्दवसेना तालुकाप्रमुख नंदादिप बोरुकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबा साळवी, दिलिप सावंत, बंड्या महाडिक, एश्वर्या घोसाळकर, सुभाष नलावडे, शहराध्यक्ष निलेश भुवड,  माजी जिप सदस्य शंकर भुवड, जागुष्टे,  माजी सभापती संतोष लाड, प्रकाश जाधव, युयुत्सु आर्ते, मनोहर सुर्वे, अजित उर्फ छोट्या गवाणकर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिपिका किर्वे, काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मिताली कडवईकर, स्मिता लाड, सारिका जाधव आदी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा