गुहागर नगरपंचायत निवडणूक २०२५ : शिवसेना–भाजप युतीचा विजय, मनसेचा प्रवेश

गुहागर, दि. २१ : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना–भाजप युतीच्या नीता विकास मालप ९९७ मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. नगरपंचायतीतील १७ जागांपैकी शिवसेना–भाजप युतीचे १३ उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजपचे ८ पैकी ५ आणि शिवसेना (शिंदे गट) ९ पैकी ८ उमेदवार यशस्वी ठरले.
उर्वरित जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १, उबाठा २, आणि मनसे १ उमेदवार विजयी झाले.

मतमोजणी प्रक्रिया गुहागर रंगमंदिर येथे निवडणूक निर्णय अधिकारी परीक्षित पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल चव्हाण आणि सहाय्यक नायब तहसीलदार स्नेहल मेहता यांच्या देखरेखीखाली पार पडली.

नगरसेवक पदावरील निकाल
प्रभाग १ – दीपक शिरधनकर : १३१ मते
प्रभाग २ – उमेश भोसले (भाजप) : २१९ मते
प्रभाग ३ – स्वरा तेलगडे (शिवसेना) : १८६ मते
प्रभाग ४ – कोमल जांगळी (अपक्ष – मनसे) : १३३ मते
प्रभाग ५ – वैशाली मावळंकर (भाजप) : बिनविरोध
प्रभाग ६ – अनुषा भावे (भाजप) : १७७ मते
प्रभाग ७ – विदिशा दणदणे (शिवसेना) : १०४ मते
प्रभाग ८ – सुषमा रहाटे (भाजप) : ११८ मते
प्रभाग ९ – शीतल कदम (राष्ट्रवादी) : ९९ मते
प्रभाग १० – प्रदीप बेंडल (शिवसेना) : १५४ मते
प्रभाग ११ – सूचित साटले (शिवसेना) : २०१ मते
प्रभाग १२ – विशाखा सोमण (भाजप) : १२० मते
प्रभाग १३ – राजेंद्र भागडे (शिवसेना) : १७७ मते
प्रभाग १४ – सौरभ भागडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) : १४० मते
प्रभाग १५ – संदेश उदेक (शिवसेना) : २२३ मते
प्रभाग १६ – अमोल गोयथळे (शिवसेना) : १६९ मते
प्रभाग १७ – श्रिया मोरे (उबाठा) : १२२ मते

ठळक मुद्दे
नगराध्यक्षपदी नीता विकास मालप विजयी, ९९७ मतांची आघाडी.
शिवसेना–भाजप युतीचे १७ पैकी १३ नगरसेवक विजयी; भाजप ५, शिवसेना ८.
मनसेने पहिल्यांदाच नगरपंचायतमध्ये खाते खोलले – कोमल जांगळी विजयी.
एका कुटुंबातील बाप–लेकाचा विजय लक्षवेधक; राजेंद्र भागडे (शिवसेना) आणि मुलगा सौरभ भागडे (राष्ट्रवादी) विजयी.
मतमोजणी शांत आणि व्यवस्थित पार पडली; विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक झाली.

गुहागरमध्ये हा निकाल शिवसेना–भाजप युतीसाठी मोठा विजय आणि मनसेसाठी ऐतिहासिक प्रवेश मानला जात आहे, तसेच स्थानिक राजकारणातील गटांमध्ये संतुलन आणि विविधता स्पष्ट झाली आहे.

आणखी वाचा