खेड, दि. ०४ (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कोकणात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांच्या सीमा तसेच अंतर्गत महत्त्वाचे ठिकाणांवर वाहनांची तपासणी सुरू आहे. भरारी पथक तैनात आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अवैध व्यवसायांवर करडी नजर ठेवत धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. रत्नागिरी शहरात पेट्रोलिंग सुरू असताना रात्री उशिरा मुरुगवाडा पांढरा समुद्र येथे पोलिसांना सापडला ब्राऊन शुगर आणि गांजा सापडला आहे.ताब्यात त्याच्याकडे सुमारे 4 लाख, 43 हजार, 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रत्नागिरी शहर पोलिसाच्या डी. बी.पथकाने तात्काळ दोघांना घेतले आहे. यातील एक जण तडीपार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात खेड येथेही मोठी कारवाई करण्यात आली असून गांजा विक्री करणाऱ्या दोघाजणांना अटक करण्यात आली असून अलिशान कारसह एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खेड तालुक्यात नांदगाव येथे आज रोजी बुधवारी मध्यरात्री उशिरा संशयित इसम १) मुस्तकिम जहांगिर कादीरी २) आतीक राऊफ कादीरी, दोन्ही रा. नांदगाव मोहल्ला ता.खेड, जि. रत्नागिरी असे दोघे ग्रे रंगाची इनोव्हा कपंनीची तिचा क्रमांक एम.एच.०५ सी.ए.२४३६ मधुन सोबत गांजाचा साठा घेवुन खास ग्राहकांना विक्री करीत असल्याची मोठी माहिती पोलिसांना मिळाली होती. याच अनुषंगाने मध्यरात्री उशिरा दोन वाजता सुमारास मौजे देवणे पुलावर माहीतीच्या आधारे संशयित इसमाच्या हालचालीवर वाँच होता. ग्रे रंगाचे टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी तिचा क्रमांक एम.एच.०५ सी.ए. २४३६ त्यामध्ये दोन इसम हे खेड ते नादगावच्या दिशेने येताना दिसले. एवढी त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या यावेळी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपली नावे मुस्तकिम जहांगिर कादीरी (वय २९ वर्षे )आतीक राऊफ कादीरी वय ३०, दोन्ही रा.नांदगाव मोहल्ला जवळ ता.खेड अशी पोलीस चौकशीत सांगितली आहेत. यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मालाचे वर्णन खालीलप्रमाणे. तब्बल नऊ हजार रुपये किमतीचा गांजा एका प्लास्टिक पिशवीमध्ये असलेला हिरवट पाने, फुले, काड्या व बिया या मुद्देमाला बरोबरच आलिशान कार दोन अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या दोन्ही संशयित आरोपींना विरोधात खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ३५९/२०२४ अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम-१९८५ कायदा कलम ८ (क), २०(ब)२, २२ (अ) भारतीय न्याय संहीता कलम ३ (५) प्रमाणे दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक श्री. श्रीकृष्ण येवले, पोकॉ.राहुल कोरे,प्रकाश पवार यांनी केली आहे.