खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लांजा रुग्णालयात फळवाटप उपक्रम

लांजा, दि. १२ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. वायफळ खर्च न करता थेट लोकांच्या सेवेसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याच्या प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार लांजा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या उपक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, जिल्हा निरीक्षक बबन कनावजे आणि ज्येष्ठ नेते मंहमदशेठ रखांगी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. रुग्णांना प्रत्यक्ष भेटून त्यांना फळांचे वाटप करत शरद पवार साहेबांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश राणे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर सचिव सचिन लिंगायत, बाबा धावणे, मनोज कोपरे, अनिकेत शेट्ये, साहिल हेगिष्टे, डॉ. देसाई तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजसेवा आणि लोकसहभागातून वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.

आणखी वाचा