मुंबई, दि. ०३ (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज गणपत पार्टे यांचा रविवारी घाटकोपर के व्हि के शाळेत पोलादपूर तालुक्यातील वारकरी सांप्रदायातील सर्व धर्मगुरूंच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली , सद्गुरु रामदादा घाडगे , सद्गुरु दादा महाराज मोरांकर , सद्गुरु रघुनाथदादा मोरे या तालुक्यातील सर्व धर्मगुरू उपस्थित होते. कार्यक्रमाला भाजपचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर , नगराध्यक्ष स्नेहल जगताप , चंद्रकांत कळंबे यांनी राज पार्टे यांना कामगारांना न्याय मिळवून देत असल्या बद्दल शुभेच्छा दिल्या व कार्याचं कौतुक केले.
या सत्कार सोहळ्यात सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम कु ज्ञानेश्वरी गाडगे हीचे सुस्वर भजनाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. सत्कार सोहळ्यासाठी आलेल्या सर्व धर्मगुरूचे तुतारी वाजवून , फुले उधळून स्वागत करण्यात आले. राज पार्टे हे मनसे चे पदाधिकारी आहेत. गेल्या तीन वर्षात त्यांनी शहरात राहून तालुक्याच्या विविध कार्यासाठी आपली माती आपली माणस ही संघटना उभी केली. मनसेच्या कामगार सेनेत त्यांनी राज्यातील विविध कंपनीतील कामगाराचे प्रश्न सोडवले. तसेच ग्रामीण भागातील महावितरण , जमीन प्रकरण , मुंबई गोवा हायवे महामार्ग , लाईट पोल आदी विषय राज पार्टे यांनी शासकीय अधिकाऱ्यां कडून आपल्या मनसे स्टाईल ने सोडवत तालुक्याला न्याय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीचे कौतुक म्हणून तालुक्यातील नागरिकांनी मिळून राज पार्टे यांचा सत्कार आयोजित केला अशी माहिती कार्यक्रमाचे समनाव्यक संतोष रिंगे , संभाजी पार्टे, अमित घाडगे यांनी माहिती देताना सांगितले.
आक्रमक कार्यकर्त्याचा सत्कार आक्रमक असलेल्या राज ठाकरे कडूनच व्हावा – सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली
राज पार्टे हे मनसेचे कामगार सेनेचे आक्रमक नेते आहेत. तालुक्याचे विविध विषय त्यांनी आक्रमकरित्या सोडवले आहेत. खरतर आमच्या हातून त्याचा सत्कार होण्यापेक्षा आक्रमक म्हणून समजले जाणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हातूनच राज पार्टे यांचा सत्कार व्हायला हवा असे सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांनी मार्गदर्शन प्रसंगी बोलताना केले. यावेळी सर्व समाजातील धर्मगुरुनी सत्कारमूर्ती राजं पार्टे याना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
राज माझ्या नेतृत्वात तयार झालेलं कार्यकर्ता – प्रवीण दरेकर
राजचां आक्रमक स्वभाव आहे. या आक्रमक स्वभावाने त्याने कामगारा साठी लढा देऊन त्यांना मिळवून दिला आहे. खरतर राज पार्टे हा माझ्या नेतृत्वात तयार झालेला कार्यकर्ता आहे असे भाजपचे प्रवीण दरेकर कार्यक्रमाला शुभेच्छा प्रसंगी बोलताना म्हणाले.
राजदादा तुम्ही तालुक्यासाठी रत्न आहात – स्नेहल जगताप नगराध्यक्षा
राज दादा यांचे कार्य कौतुकास्पद आहे. कामगारांना न्याय देताना त्यांचे मनसे स्टाईल ने उत्तर असते. तालुक्यातील अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. राजंदादा तुम्ही पोलादपूर तालुक्यासाठी एक रत्न आहेत असे स्नेहल जगताप म्हणाल्या.








