meditation : मेडीटेशन म्हणजे नक्की काय आहे?

मेडीटेशन म्हणजे नक्की काय आहे? असा प्रश्न भरपुर लोकांना पडतो. मग सगळे थोडी माहिती करुन घेतात व ध्यान करायचा प्रयत्न करतात .मग काही बदल होत नाहीये असं म्हणुन सोडुन देतो वा मग आपल्याला जमतच नाही बुवा असा समज करुन ध्यान करायचं थांबवता. असा सर्वसाधरणपणे होत पण आता यामध्ये पण जागृती होऊ लागली आहे खूप लोक ते करायचा प्रयत्नही करु लागली आहेत.
तर आपण मेडिटेशन म्हणजे ध्यान करायचा निर्णय घेतला की आपल्याला सातत्य ठेवायला हवे व तसे मनाशी पक्के करावे. आता ध्यान कसे करायचे ते पुढे सांगते. रोज घड्याळ लाऊन 5मिनिटे डोळे मिटून शांत बसण्यास सुरुवात करावी. त्याची सवय लाऊन घ्यावी.
21 दिवस तरी आपण असे करावे.
21 दिवसात आपल्याला सवय लागते असे म्हणतात.
बरं 5 मिनिट शांत बसायचे म्हणजे काय ?
तर सैल कपडे घालुन शक्यतो शांत ठिकाणी डोळे मिटून बसायच आणि श्र्वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा म्हणजे नक्की कसा? तर जे विचार येतात ते येऊ द्यायचे आणि शांत व लांब श्वास घ्यायचे , आता हे वाचताना तुमच्या असेंहि लक्षात येईल की तुम्ही मोठा व शांत श्वास घेऊ शकता का? कारण आपण कॉन्सिअसली कधीच शांत आणि लांब श्वास घेत नसतो, कारण ते आपल्याला ते जमतच नाही, आपण डेली रूटीन सर्व करत असतो पण श्वास अर्धवट घेत असतो हे स्वनिरिक्षणावरून लक्षात येते.
जर आपण पूर्ण श्वास घेत असुत तर आपले रोगही नष्ट होऊ लागतात असं सायन्स आहे.
तर असे पूर्ण श्वास व शांत श्वास कसे घ्यायचे? तर ते मोजुन श्र्वास घेताना 1,2,3,4 असा मनात मोजायच
नंतर श्वास रोखून धरायचा व मनात 1,2,3,4 मोजयच व सोडताना परत 1,2,3,4,5,6 अस मनात मोजयच.वर लिहिलेल्या प्रमाणे करुन बघायचा .
हे रोज केल्याने हळुहळू शांत श्वास येऊ लागतात.
म्हणजेच मोठे येऊ लागतात. तर ध्यान म्हणजे असे शांत श्वास घ्यायचे व जे विचार येतात ते तसेच येऊ द्यायचे व परत परत श्वसाकडे लक्ष आणण्याचा प्रयत्न करायचा. श्वासाचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. ध्यान केल्याने सकारात्मकता वाढते व आयुष्यात बदल होण्यास सुरुवात व मदत होते.
आरोग्य, नाती, नोकरी किंवा व्यवसाय,पैसा या भागांमध्ये प्रगती होण्यास सुरुवात होते. आपण छोट्या छोट्या गोष्टी जागरूकतेने पाहू लागतो, जागरूकता वाढते. शरीर रिलॅक्स होऊ लागते. अंतरद्यान (इंच्युशन) वाढते. पुढे काय होणार आहे याची आधीच कल्पना येऊ लागते. एखादे काम करत असू तर ते खूप उत्तम होते सर्वोत्कृष्ट होते. वाढलेले वय दिसत नाही. समस्या निराकरण कौशल्य वाढते.
मी मागील 4 वर्षापासून रोज ना चुकता ध्यान करते ज्यामुळे माझ्यात आतुन व बाहेरून बदल झालेत. प्रेम व शांतीची भावना वाढली आहे . आपण सगळे एक असतो एनर्जी लेव्हल ला हे समजु लागले आहे. कारण आपल्या सगळ्या माणसांमधील चैतन्य एकच असते हे समजू लागले , दुसऱ्याच्या आयुष्यात बदल करायची समज आलीय. माझ्यातील आत्मविश्वास द्वीगुणित झालंय.
आरोग्याबाबत चे माझी BP ची गोळी बंद झाली, विचारांमध्ये स्पष्टता आली. आता कोणत्याही परस्थितीत मधून सकारात्मक विचार डोक्यात येतात.
मला मे मिळाले. पर्पज ऑफ लाईफ सापडला. मे दुसऱ्यांची आयुष्य बदलू लागले व सकारात्मक करू लागले मी लाईफ कोच म्हणून काम करतेय. त्यात विविध कोर्स आहेत माझ्याकडे.
माझी वेबसाईट (www.madhuribondre.com) आहे त्यावर विविध कोर्स मी तयार केले आहेत ज्यामुळे आयुष्य सुधारत पैष्याने, शरीराने, करिअर व नात्यांमध्ये ते सुद्धा कोणताही औषध ना घेता सुधारणा होते फक्त 4 वाक्य वापरून, scientific technique ho opno याचे सेशन घेते, तसेच मी लाईव्ह सेशन घेते. 1-1 कोचिंग आहे . लोकांना मदत करू शकते यामुळे मला आंतरिक समाधान मिळत आहे. मी आतुन व बाहेरून आनंदी राहत आहे. मला जे करायचे ते मला मिळाल आहे.
Thank you so much 
– माधुरी बोंद्रे- रहाळकर
Energy and Vibrations
कर्वेनगर, पुणे

आणखी वाचा