कोकण आयुर्वेदतर्फे कडवई येथे महाआरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

संगमेश्वर, दि. १२ (प्रतिनिधी): कोकण आयुर्वेदच्या वतीने कडवई येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य, रोगनिदान व उपचार शिबिरास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्य तपासणी व उपचार सेवा घेतल्या. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याच्या हेतूने आयोजित या शिबिरात विविध आजारांवर मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात नाडी परीक्षण, गुडघ्याचे व मणक्याचे आजार, वरिष्ठ नागरिकांसाठी मधुमेह तपासणी तसेच आहार, योगासन व आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. इलेक्ट्रोथेरपी, अ‍ॅक्युपंक्चर, कपिंग थेरपी, कायरोप्रॅक्टिक, मोक्सा ट्रीटमेंट व कायरोगन थेरपी अशा आधुनिक व पारंपरिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिरात डॉ. ऋतुजा दोरके,
प्रथमेश सूर्यकांत नलावडे (कायरोप्रॅक्टिशनर), प्राची घाग (नलावडे) (अ‍ॅक्युपंक्चरिस्ट), सूर्यकांत आत्माराम नलावडे (नाडी तज्ज्ञ), डॉ. सत्यनारायण जयस्वारा (गुडघे स्पेशालिस्ट) आणि डॉ. चंद्रकांत यडगुडकर (वातरोग तज्ज्ञ) या तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेऊन रुग्णांची सविस्तर तपासणी केली.
या शिबिराच्या यशानंतर दर मंगळवारी कडवई येथे नियमित मोफत आरोग्य कॅम्प आयोजित करण्याची घोषणा आयोजकांनी केली.
शिबिराबाबत बोलताना आयोजक सूर्यकांत नलावडे म्हणाले, “कोकण आयुर्वेद स्पाईन अँड पॅरालिसिस ट्रीटमेंट रिहॅबिलिटेशन सेंटर, कडवई व सावर्डे येथे मणक्याच्या आणि गुडघ्याच्या आजारांवर मॅन्युअल थेरपी व ओझोन उपचाराद्वारे रुग्णांवर उपचार केले जातात. शिबिराद्वारे अधिकाधिक रुग्णांपर्यंत मोफत आणि दर्जेदार उपचार पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

आणखी वाचा