गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठीतून शुभेच्छा

“सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया!” असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच गणपती बाप्पाचं दर्शन घेतानाचा एक फोटोदेखील मोदी यांनी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी काढलेला फोटो मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

आणखी वाचा