मुंबई विभागात रेल्वे सेवा विस्कळीत; काही गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

मुंबई, दि. ०३ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात प्रभादेवी परिसरातील विशेष वाहतूक व्यवस्था आणि परळ–करे रोड दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपूल (ROB) तोडण्याच्या कामासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबई सीएसएमटी–कल्याण मार्गावरील रेल्वे सेवांवर परिणाम होणार असून काही गाड्या अर्धवट रद्द, काहींचे प्रारंभ/अंतिम स्थानक बदलण्यात आले आहे, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

अर्धवट रद्द (Short Termination) गाड्या :
दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी 12052 मडगाव–मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस ही पनवेल येथेच थांबवण्यात येणार आहे. तसेच 22120 मडगाव–मुंबई तेजस एक्सप्रेस आणि 10104 मडगाव–मुंबई मांडवी एक्सप्रेस या गाड्याही पनवेलपर्यंतच धावतील. 12134 मंगळुरू–मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी ठाणे येथेच थांबवण्यात येणार आहे.

अर्धवट सुरू होणाऱ्या (Short Origination) गाड्या :
दि. ४ एप्रिल रोजी सुटणारी 20111 मुंबई–मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी पनवेल येथूनच सुटणार आहे. दि. ५ एप्रिल रोजीची 12051 जनशताब्दी एक्सप्रेस आणि 22119 तेजस एक्सप्रेस या गाड्याही पनवेलहूनच सुटतील.

वेळापत्रक बदल (Rescheduled) :
दि. ५ एप्रिल रोजीची 22229 वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी १५ मिनिटे उशिरा म्हणजे सकाळी ५:४० वाजता सुटेल. 11003 दादर–सावंतवाडी ‘तुतारी’ एक्सप्रेस तब्बल ३८५ मिनिटे उशिराने सकाळी ६:३० वाजता सुटणार आहे. 10103 मांडवी एक्सप्रेस सकाळी ७:५० वाजता (४० मिनिटे उशिराने), तर 01129 विशेष गाडी सकाळी ७:१० वाजता (४१५ मिनिटे उशिराने) धावणार आहे.

नियंत्रण (Regulation) :
दि. ४ एप्रिल रोजीची 20112 मडगाव–मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी दिवा, ठाणे आणि दादर स्थानकांदरम्यान सुमारे ३० मिनिटे उशिराने धावेल.

या बदलांमुळे प्रवाशांना गैरसोय होण्याची शक्यता असून, प्रवाशांनी अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा