पालघर, दि. १७ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील रहिवासी श्रीमती सुलोचना वामन तावडे (वय ८७) यांचे गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी पालघर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्या पालघर येथे वास्तव्यास होत्या.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयामार्फत पती वामन तावडे यांच्या निधनानंतर मिळणारे कलाकार मानधन त्यांना प्राप्त होत होते. त्यांच्या पश्चात मुलगा प्रदीप, पालघर जिल्ह्यातील पत्रकार मंगेश तावडे, सुना, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे.
पालघर येथेच शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेसमयी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार मंगेश तावडे यांना मातृशोक; श्रीमती सुलोचना वामन तावडे यांचे निधन








