रत्नागिरी, दि. २० : कै. रामचंद्र सप्रे स्मृती एच२ई पॉवर सिस्टीम प्रस्तुत महाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत मुंबई शहरच्या निर्वाण शाह याने दमदार खेळ करत अजिंक्यपद पटकावले. माळनाका येथील मराठा भवन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रतिथयश उद्योजक व चेसमेन रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रसन्न आंबुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच केजीएन सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई, डॉ. श्रीकृष्ण जोशी तसेच जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी मंगेश मोडक व नितीन कानविंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
आभार प्रदर्शन करताना नितीन कानविंदे यांनी सांगितले की, “२०१३ साली श्री. दिलीप नवरे यांनी लावलेले या स्पर्धेचे रोपटे आज वृक्षात परिवर्तित झाले असून, त्याच्या सावलीत राज्यभरातील बुद्धिबळपटू घडत आहेत.” यावेळी त्यांनी खेळाडू, पालक, परीक्षक, पाध्ये गांधी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस तसेच पत्रकार बांधवांचे आभार मानले.
महाराष्ट्र संघाची घोषणा
फेब्रुवारी महिन्यात होसूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. या संघात एकूण ९ खेळाडूंचा समावेश असून रत्नागिरीच्या सौरिश कशेळकरने संघात स्थान मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
महाराष्ट्र संघ – गटनिहाय निवड
२३०० रेटिंगखालील गट:
इंद्रजीत महिंद्रकर (छत्रपती संभाजीनगर), आदित्य सावळकर (कोल्हापूर)
२००० रेटिंगखालील गट:
निर्वाण शाह (मुंबई शहर), सौरिश कशेळकर (रत्नागिरी)
१७०० रेटिंगखालील गट:
औळे संघर्ष (चंद्रपूर), अभिजय अनिरुद्ध वाळवेकर (पुणे)
१७०० रेटिंगखालील महिला:
साजिरी देशमुख (सातारा), महुआ देशपांडे (मुंबई उपनगर)
२००० रेटिंगखालील सर्वोत्तम महिला:
प्रिशा घोलप (रायगड), शर्वरी कबनूरकर (कोल्हापूर)
स्पर्धेतील बक्षिसांची ठळक यादी
खुला गट:
निर्वाण शाह, इंद्रजीत महिंद्रकर, सौरिश कशेळकर, आदित्य सावळकर, अनिश गोडसे, कौस्तव बराट, संजय शेजळ, शुभम लाकूडकर, संघर्ष औळे, विहान अग्रवाल
२००० रेटिंगखालील गट:
सागर शेनॉय, आदित्य चव्हाण, गणेश ताजणे, वरद पाटील, ऋषिकेश कबनूरकर
१७०० रेटिंगखालील गट:
अभिजय वाळवेकर, वरद मोरे, श्रीश कुलकर्णी, नोव्हा अय्यर जुयाल, अंबर गंगवाल
सर्वोत्तम महिला:
प्रिशा घोलप, शर्वरी कबनूरकर, साजिरी देशमुख, महुआ देशपांडे, दुर्वा बोम्बळे
वयोगटनिहाय विजेते:
१५ वर्षांखालील: सर्वेश पोतदार, आराध्य केंजळे, आरुष सरोदे, वेदांग अस्नीकर, ऋतुराज पांचाळ
१३ वर्षांखालील: ओम रामगुडे, कश्यप खखारिया, नैतिक पटवर्धन, आयुष रायकर, रेयांश जैन
११ वर्षांखालील: मेधांश पूजारी, राघव पावडे, शौर्य भोंडवे, सर्वज्ञ बलगुडे, अगस्त्य कसाट
९ वर्षांखालील: आरव झवर, अद्वैत कुलकर्णी, आदिराज डोईजड, अभिनंदन अरिकृष्णन, प्रियन साळुंखे
५५ वर्षांवरील गट:
सुहास कामतेकर, अतुल भालेराव, अशोक देसाई, गिरीश तोरवेकर
सर्वोत्तम रत्नागिरी जिल्हा खेळाडू:
सोहम रुमडे, साहस नारकर, अक्षय खेर, साईप्रसाद साळवी, मानस सिधये
या यशस्वी स्पर्धेमुळे रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ क्षेत्रात पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाला आहे.








