दहावी नंतरच्या करिअर मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ — व्याख्याते माधव अंकलगे सरांचे प्रभावी मार्गदर्शन

महाड, दि. १२ : श्री संत रोहिदास सभागृह, महाड येथे श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूट, वेरळ (ता. खेड, जि. रत्नागिरी) यांच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात इयत्ता दहावी नंतरच्या करिअर निवडीबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात व्याख्याते माधव विश्वनाथ अंकलगे सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास नियोजन, करिअर पर्याय आणि योग्य साईड निवडीविषयी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले.

अंकलगे सरांनी दहावी परीक्षेच्या तयारीचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्य राखणे आवश्यक असल्याचे सांगितले. पुढील शिक्षणात विज्ञान, कला, वाणिज्य, आयटीआय, पॉलिटेक्निक, डिप्लोमा अशा विविध शाखांमधील संधींबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात ENTRANCE TEST मध्ये यश मिळवलेल्या आणि स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली.

या मार्गदर्शन कार्यक्रमास समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल, वेरळचे अध्यक्ष सुयशजी पाष्टे, सचिव शेटवे साहेब, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातही अशा उपयुक्त मार्गदर्शन सत्रांची अपेक्षा व्यक्त केली.

आणखी वाचा