रत्नागिरी, दि. २१ : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीतील विद्यार्थी, युवक आणि युवती यांनी सोमवारी (२१ जुलै) एकत्र येत अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, अभिजीत दीपके आणि इतर उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांप्रती ऐक्य दर्शवित, सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळाचा वापर करून रुग्णालयात हलवल्याच्या घटनेचाही निषेध करण्यात आला.
यावेळी छाया कोकरे, अमर पवार, प्रथमेश गोरे, स्वप्नील कांबळे, तेजस कोकरे, तेजस्विनी कांबळे, अलीशा पवार, पंकज कांबळे, प्रतीक पवार, मंथन पवार, सुभोध जाधव, सौरभ आयरे, वृषाली पालकर, प्राची चव्हाण, पूजा सावंत, सूरज सावंत, श्रेया कांबळे, गायत्री पवार, करुणा कांबळे, वंश आयरे, सांची दांडगे, अनिकेत कांबळे, रोशनी कांबळे, दिव्या कांबळे, नितेश कांबळे, विनया गमरे, श्रद्धा पवार यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि युवक-युवती उपस्थित होते.








