रत्नागिरी, दि. 29 (प्रतिनिधी) : दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, तालुका व जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या वतीने बुधवारी (दि. 29 जुलै) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन (सिव्हिल हॉस्पिटल शेजारी) येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एल. व्ही. पवार होते. प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिपक सिताराम जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभागाचे जिल्हाध्यक्ष जे. आर. गमरे यांच्या अधिपत्याखाली विधी संचालन करण्यात आले.
यावेळी जे. आर. गमरे, संजय जाधव, सुरेंद्र जाधव, मुकुंद कांबळे (तालुकाध्यक्ष), दिपक जाधव (महाराष्ट्र प्रदेश सचिव), एल. व्ही. पवार (जिल्हाध्यक्ष), शिवराम विठ्ठल कदम (कोषाध्यक्ष) आणि प्रकाश पवार तसेच अस्मिताताई कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत भगवान बुद्धांचे विचार, वर्षावासाचे महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य आणि बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास दिपाली दिपक जाधव (उपाध्यक्षा, जिल्हा शाखा), अस्मिता कांबळे (तालुकाध्यक्षा), मानसी तांबे, प्रदीपदादा भिकाजी पवार (सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन), मुकुंद राया कांबळे, अभिजित तांबे (तालुका सचिव), मनोज कांबळे, सुरेंद्र जाधव यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित तांबे यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण व धार्मिक वातावरणात संपन्न झाला.







