संकेता सावंत यांची तायक्वांदो राज्यस्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

रत्नागिरी, दि. ०३ : लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड झाली आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूरतर्फे आयोजित ३५ वी महाराष्ट्र स्टेट सिनिअर क्योरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप आणि ११ वी महाराष्ट्र स्टेट सिनिअर पुमसे चॅम्पियनशिप ५ ते ७ डिसेंबर रोजी औसा रोड, लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी संकेता सावंत यांना मिळाली आहे.

अभ्युदय नगर येथील नगर परिषद बहुउद्देशीय सभागृहात ईगल तायक्वांदो अकॅडमीमार्फत प्रशिक्षण दिले जाते. संकेता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुले तायक्वांदोमध्ये प्रावीण्य मिळवत असून विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश मिळवत आहेत.

संकेता सावंत यांच्या निवडीबद्दल राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी तसेच ईगल तायक्वांदो अकॅडमीचे पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून आगामी राज्यस्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

आणखी वाचा