जोरदार शक्ती प्रदर्शन करत नितेश राणेनी केला उमेदवारी अर्ज दाखल…!

कणकवली, दि. २८ (प्रतिनिधी): कणकवली  विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाजपाचे नितेश राणे यांनी आज भव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्यापूर्वी   शहरातील  श्री गांगो मंदिर येथून रॅली काढण्यात आली.ही रॅली शहरातून  तहसिल कार्यालयाकडे येताच नितेश राणे  यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे दखल केला.
यावेळी त्यांचे सोबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते.
रॅलीत नारायण राणे यांच्या पत्नी सौ.निलम राणे, नंदिता राणे, प्रियंका राणे,अभिराज राणे, निमिष राणे,माजी आमदार प्रमोद जठार,अजित गोगटे, मनीष दळवी,अतुल काळसेकर, संदेश सावंत, समीर नलावडे, शिंदे सेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आदी सहभागी झाले होते.
दुपारी कडक ऊन असूनही कार्यकर्ते,लोक मोठ्या संख्येने  सभेलाउपस्थित होते.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आणखी वाचा