पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी पाली बसस्थांनकाच्या सुरु असलेल्या कामाची केली पाहणी

लांजा, दि. २२ : राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आज पाली येथे सुरू असलेल्या बस स्थानकाच्या कामाची पाहणी करत येथील ठेकेदाराला कामाची गती वाढण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर काम पूर्ण करावे असे सांगितले आहे. यावेळेस पालकमंत्री यांनी पाली बसस्थानकांच्या समस्यांची चौकशी करत पाली बस स्थानका बाहेरील असणारे खोके धारकांची त्यांच्या समस्यांची चर्चा केली त्याचप्रमाणे पाली येथे होणाऱ्या बस स्थानकासमोरील असणारे खोके हे भविष्यात अडचण निर्माण करू शकतात त्यामुळे आपण हे खोके उचलून त्यांना पर्यायी मार्ग काढून त्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य आवश्यक असून त्याबाबत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.

आणखी वाचा