छत्रपती संभाजी राजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील मतदार संघांचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य : प्रशांत यादव

देवरुख, दि. १० (प्रतिनिधी):  चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे मविआचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यांचा आज गावभेट कार्यक्रमांची सांगता कसबा येथील कालभैरव मंदिरा नजीक जाहीर सभेत झाली. यावेळी बोलताना छत्रपती संभाजी राजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमितील मतदार संघांचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य असल्याचे उदगार प्रशांत यादव यांनी काढले.
प्रशांत यादव यांनी आज सकाळी आरवली पासून गावभेट कार्यक्रमला सुरवात केली, आरवली, माखजन, कर्जुवे आदी गावाना भेटी देत ते सांयंकाळी कसबा येथे आले असता कसबा गटाच्या वतीने त्यांचे स्वागत करणेत आले.
श्री, प्रशांत यादव यांनी प्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना अभिवादन करुन श्री देवी जाखमातेचेआणि कालभैरवाचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले.यावेळी सभेची प्रस्तावना उबाठा शिवसेना  गटाचे उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर यांनी केला यामध्ये कसबा गटाच्या वतीने दोन हजाराहून अधिक लीड देण्याचे आश्वासन दिले.
माजी जिप अध्यक्ष रोहन बने यांनी आपल्या भाषणात प्रशांत यादव यांचे कार्य कौतुकास्पद असुन कमी वेळात घरोघर पोचणारा कार्यकर्ता म्हणुन प्रशांत यादव यांची ओळख असल्याचे सांगताना आपण संगमेश्वर तालुक्यातून भरघोस मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले.
जिपचे माजी अध्यक्ष विद्यमान उबाठा उध्दवसेनेचे सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी १९९७ च्या निकालाचा किस्सा सांगताना आपण दुसऱ्या टर्मला सेने कडून धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवली त्यावेळी निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात आली होती. त्या वेळी मत मोजणी वेळी एक मार्गी धनुष्यबाण धनुष्यबाण अशा मतपत्रिका मोजताना मतमोजणी अधिकाऱ्यांनी महाडिक यांच्यावर मतदारांनी धनुष्यबाणाचा अभिषेक केल्याचे पाहायला मिळत असल्याचे उदगार काढले होते. असेच चित्र आता होणाऱ्या निवडणूकीच्या वेळी दिसेल फक्त फरक एवढाच असेल त्या वेळी धनुष्यबाण होता. आता उमेदवार म्हणुन प्रशांत यादव असुन निशाणी तुतारी वाजवणारा माणूस असेल असे सांगताना अल्पवधित सर्व घटक पक्षात एकरूप होणारा, घराघरात पोचणारा उमेदवार म्हणजे प्रशांत यादव असल्याचे सांगून सर्वांनी घरा घरात जाऊन तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी पोचवा. असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला, तसेच आपण तालुक्यातून भरघोस मताधिक्य देणार असा विश्वास राजेंद्र महाडिक यांनी प्रशांत यादव यांना दिला.
या सभेला संबोधताना प्रशांत यादव यांनी निवडणूकीच्या माध्यमातून होणारी ही लढाई खुद्दार विरुद्ध गद्दार अशी असल्याचे सांगताना मी निवडून येईन किंवा नाही माहित नाही मात्र मी स्वतःला भाग्यवान समजतो ज्या भूमीत छत्रपती संभाजी राजे यांनी विचारांशी तडजोड केली नाही, स्वाभिमानाची लढाई लढले त्याच धर्तीवर ही लढाई आता जनतेने हाती घेतली आहे, येथील जनता ही माझ्या पाठीशी नसून,श्री. उद्धव ठाकरे, श्री, शरदचंद्र पवार या नेत्यांवर, महाराष्ट्रावर, पक्षांवर प्रेम करणाऱ्या माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
ज्या गद्दारानी उद्धवं ठाकरे मुख्यमंत्री असताना ते आजारी असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले, ज्या पवार साहेबाना वयाच्या  ८४ व्या वर्षी वणवण फिरायला लावले ते सर्व सामान्य जनतेला पटलेले नाही. त्यामुळे आज सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे.एक भक्कम असे महाडिक कुटुंब माझ्या बरोबर आहे. आज आघाडीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या सोबत आहेत, मतदार संघ मोठा आहे, वेळेअभावी प्रत्येक ठिकाणी पोचणे शक्य नाही, अजून माझी अनेक जणांशी पुरेशी ओळख नाही परंतु मी आपल्या सर्वांच्या विकासाच्या कल्पना पुर्ण करण्याचे आपणास आश्वासन देतो असे सांगून सर्वांनी मला आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा असे प्रशांत यादव यांनी आवाहन  केले.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे जिल्हाध्यक्ष  सुरेश बने, मुरलीधर बोरसुतकर गुरुजी यांनी उपस्थितlना वीस तारखेला तुतारीवाला माणूस या चिन्हा समोरील बटण दाबून प्रशांत यादव यांना विजयी करण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे जिल्हाध्यक्ष  सुरेश बने, माजी जिप अध्यक्ष राजेंद्र महाडिक, रोहन बने, माजी जिप सदस्य संतोष थेराडे, माजी पं.स. सभापती, तालुका प्रमुख नंदादीप बोरुरकर, सुजित उर्फ बंडा महाडिक, उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर, आदिसोबत सर्व विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा