दांडिया खेळता खेळता विद्यार्थिनीचा मृत्यू ; राजापूर हळहळले

राजापूर, दि. १२ (प्रतिनिधी): कोकणात राजापूर तालुक्यात दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला खेळताना चक्कर आली शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र दुर्दैवाने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.ऐन नवरात्रोत्सवात राजापूर पाचल परिसरावर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात हा दुर्दैवी सगळ्यांनाच मनाला चटका लावून जाणारा प्रसंग घडला आहे. ऐन नवरात्रोत्सवात घडलेल्या या घटनेने पाचल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजापूर तालुक्यातील आजीवली मानेवाडी येथील वैष्णवी प्रकाश माने वय १६ या विद्यार्थिनीचा नवरात्रोत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. सरस्वती पूजनावेळी सुरू असलेल्या दांडिया कार्यक्रमात हा दुर्दैवी प्रसंग घडला
नवरात्रउत्सवात विविध ठिकाणी शाळेत देवी बसवली जाते देवीचे पूजन केले जाते व नवरात्रोत्सवाचा आनंदात लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच सहभागी होतात या पारंपरिक सणाचा आनंद घेताना ही परंपरा कळावी हा यामागे उद्देश असतो. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेचार वाजवण्याच्या सुमारास या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुपारच्या सुमारास दांडिया कार्यक्रम सुरू असताना या मुलीला चक्कर आली. उपस्थित असलेल्या शिक्षकांनी तात्काळ धावपळ करून तिला डॉक्टरांकडे दाखल केले. चक्कर आलेले ती मुलगी खाली बसली शिक्षकांनी क्षणाचाही वेळ दवडता रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या मुलीचा तात्काळ इसीजी काढण्यात आला मात्र त्या मुलीचा मृत्यू झाला होता ही वाईट बातमी कळताच माने कुटुंबियांबरोबरचसरस्वती विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथील शिक्षक व विद्यार्थी ही हळहळले आपल्याबरोबर रोज शाळेत येणारी,अभ्यास करणारी आनंदाने दांडियात सहभागी होणारी काही वेळापूर्वी आपल्या सोबतच आनंदाने दांडिया खेळत असलेली मैत्रीण सोडून गेल्याचे मोठे दुःख झाल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्याही अश्रूचा बांध फुटला. या धक्कादायक प्रकारामुळे माझे कुटुंबीयांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे
वैष्णवी पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण बँकेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. तिच्या पश्चात आई वडील, काका, काकू दोन सखी लहान भावंड असा मोठा परिवार आहे  राजापूर पाचल पोलीस ठाण्यात २६/२०२४ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
वैष्णवी ही विद्यार्थिनी अभ्यासात अत्यंत हुशार होती.  इयत्ता दहावीत आजीवली हायस्कूल मध्ये तिने ८६ टक्के गुण मिळवून हायस्कूलच्या गुणवत्ता यादी तिचं नाव चमकलं होतं. इतकच नाही तर तिला इंजिनिअरिंग करायचं होतं हे तिच स्वप्न होतं मात्र निष्ठूर नियतीच्या खेळामुळे अधुरं राहिला आहे. प्रशासन अनेक योजना या जनहितासाठी राबवत असतानाच आरोग्य व शिक्षण या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी  वैष्णवी सारख्या अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही किलोमीटरची पायपीट करून दररोज आपल्या शाळेत यावं लागतं हेही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील धक्कादायक वास्तव या दुर्दैवी घटनेमुळे समोर आल आहे.
दहावी मध्ये उत्तम मार्क मिळाल्यानंतर तिला इंजिनिअरिंग करायचं होतं यासाठी तिला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन हे मिळालं होतं मात्र आई-वडिलांची आठवण येत असल्याने तिने ऍडमिशन मिळालेल हायस्कूल सोडून पुन्हा पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हायस्कूल प्रमाणे याही महाविद्यालयातही वैष्णवी ने अभ्यासातील गुणवत्ता, उत्तम वक्तृत्व शैली, खेळातील आवड यामुळे शाळेतील गुरुजनांची मन जिंकली होती. अलीकडेच पंधरा दिवसांपूर्वी तिने राजापूर ओणी हायकूल मध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेत तिचा प्रथम क्रमांक आला होता अशीही मोठी आठवण वैष्णवीच्या निकटवर्तीयांनी सांगितली. पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयतील सायन्स मधून इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेत होती. अभ्यासाबरोबरच अनेक खेळांमध्ये तिला खेळण्याची मोठी आवड होती ही आठवण सांगताना गुरुजनांचेही डोळे पाणावले.
शाळेसाठी दररोज पायपीट
वैष्णवी हिला दांडिया खेळताना चक्कर आली खाली बसली यातच तिचा मृत्यू झाला या दुःखद घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही काही किलोमीटरची करावी लागणारी पायपीट हे चित्र समोर आला आहे . राजापूर पाचल येथील महाविद्यालय शिकणारी वैष्णवी ही आजीवली या आपल्या गावातून धनगर वाडीतून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून एसटी स्टॉप पर्यंत रोज येत होती.  नंतर त्यापुढे दररोज एक तास एसटीने ने प्रवास करून पाचल मध्ये हायस्कुल मध्ये जात होती. वैष्णवी हीच्यासारख्या अनेक मुलांना आजही ग्रामीण भागात काही किलोमीटरची पायपीट करून शिक्षण घेण्याकरता  यावं लागतं हे वास्तव आहे. मात्र सगळ्याच मुलांना हा त्रास शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट सहन होते असं नाही. वैष्णवी हिला अचानक चक्कर कशामुळे आली हे समजू शकले नसलं तरीही शालेय विद्यार्थ्यांची पायपीट वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना काही उपाययोजना करता आल्या तर विद्यार्थ्यांना होणारा हा ही त्रास वाचू शकेल. यासाठी ही प्रयत्न व्हायला हवेत असं म्हटल्यास  वावगे ठरणार नाही. वैष्णवीचे वडील सिंधुदुर्ग ग्रामीण बँकेत व्यवस्थापक या मोठ्या पदावर आहेत तर आई गृहिणी आहे तिच्या पश्चात एक बहिण भाऊ अशी दोन लहान भावंड, काका काकी असा मोठा परिवार आहे. या सगळ्या घटनेची नोंद राजापूर पाचल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

आणखी वाचा