रत्नागिरी, दि. १८ (प्रतिनिधी): येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत असणाऱ्या माई ह्युंदाई मध्ये ह्युंदाई मोटर्सच्यावतीने सादर केलेल्या नवीन क्रेटाचं अनावरण करण्यात आले. क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माई ह्युंदाईचे एच आर जनरल मॕनेजर ऊमेश पाटील, डेप्युटी जनरल मॕनेजर विलास प्रभू , रत्नागिरी चे सेल्स हेड दीपक कराळे, प्रसिद्ध उद्योजक सर्वश्री मुकेश गुंदेचा, दिनेश जैन, सुमित ओसवाल, अक्रमशेठ नाखवा तसेच ग्राहक, बँकर्स, विमा कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन फेसलिफ्ट क्रेटा ही ई, ईएक्स, एस, एस (०), एसएक्स टेक, एसएक्स (०) अशा सात प्रकारात उपलब्ध आहे. 1.5 एमपीआय, 1.5 टर्बो जीडीआय, 1.5 युझेड सीआरडीआय अशा तीन इंजिन प्रकार आहेत. 6 मोनोटोन्स कलर्स आणि 1 ड्युअल टोन पर्याय आहे. एमटी, एटी, आयएनटी आणि डीसीटी असे 4 ट्रान्समिशन पर्याय आहेत. 70+ ब्लूलिंक वैशिष्ट्ये, 6 एअरबॅग मानकांसह 35 सुरक्षा वैशिष्ट्ये, 19 ह्युंदाई स्मार्ट सेन्स – ॲडस् वैशिष्ट्ये, 130+ एम्बेडेड व्हॉइस कमांड, ड्युअल झोन एफएटीसी, टिल्ट आणि टेलिस्कोप्लो स्टेअरिंग, क्वाड बीम, एलईडी हेडलॅम्प, कनेक्टिंग टेल लॅम्प डिझाइन असे नवीन वैशिष्ट आहेत. 8 स्पीकर बॉस्क प्रीमियम संगीत प्रणाली, जिओ सावन म्युझिक 2 वर्षे मोफत सबस्क्रिप्शन तसेच चालकासाठी सोयीस्कर बीव्हीएम, एमव्हीएम सारखी वैशिष्ट्ये यामध्ये दिलेली आहेत.








