सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरण तपासणी शिबिर

रत्नागिरी, दि. १८ – भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम, महानगर गॅस लिमिटेड व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी इमारत, जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी येथे
गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ व शुक्रवार दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी
सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

पात्र दिव्यांग प्रवर्ग :

१) अस्थिव्यंग
२) बहुविकलांग
३) सेरेब्रल पाल्सी
४) कर्णबधिर
५) अंध (९० टक्क्यांवरील)
६) कुष्ठरोग निवारीत

बौद्धिक अक्षम (मतिमंद) दिव्यांगांची या शिबिरात कोणतीही तपासणी होणार नाही.

पात्रतेचे निकष :

१) ४० टक्के किंवा त्यावरील दिव्यांग प्रमाणपत्र (यूडीआयडी कार्ड आवश्यक)
२) आधार कार्ड
३) रेशन कार्ड – वार्षिक उत्पन्न २ लाख ७० हजार रुपयांखाली असणे किंवा संजय गांधी निराधार पेन्शन प्रमाणपत्र / माननीय खासदार, आमदार, सरपंच किंवा नगरसेवक यांचा उत्पन्न दाखला
४) मागील ३ वर्षांत त्याच प्रकारचे उपकरण घेतलेले नसावे
५) मागील ५ वर्षांत बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल व भ्रमणध्वनीचा लाभ घेतलेला नसावा
६) बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकलसाठी अस्थिव्यंग प्रकारातील ६० टक्क्यांवरील अपंगत्व असलेले, कमरेखाली दिव्यांग व दोन्ही हात कार्यक्षम असलेले लाभार्थी पात्र ठरतील

तपासणीनुसार मिळणारी सहाय्यक साधने :

व्हीलचेअर, कुबड्या, कोपर काठी, चालण्यासाठी काठी, श्रवणयंत्र, भ्रमणध्वनी, ब्रेल साहित्य संच, सेरेब्रल पाल्सी खुर्ची, बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल, दैनंदिन उपयोग साहित्य संच आदी सहाय्यक साधने प्रस्तावित करण्यात येणार आहेत.

स्थळ व वेळ :

स्थळ : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी इमारत, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी
दिनांक : १९ व २० फेब्रुवारी २०२६
वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी ४.००
प्रकार : ४० टक्क्यांवरील प्रमाणित दिव्यांग

जिल्ह्यातील पात्र दिव्यांग नागरिकांनी या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी – ९८३४४४०२००

आणखी वाचा