रत्नागिरी, दि. २३ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रत्नागिरी तालुक्यातील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. या छाननीदरम्यान हातखंबा जिल्हा परिषद गटातील दोन उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी आता ३७ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या २० गणांसाठी ५१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी एकूण ५६ गट असून रत्नागिरी तालुक्यात १० गट आहेत. या गटांसाठी एकूण ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज झालेल्या छाननीमध्ये हातखंबा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले जनार्दन रामचंद्र जाधव यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेली व्यक्ती ही संबंधित हातखंबा गटाऐवजी अन्य गटातील असल्याचे तसेच सूचकाची स्वाक्षरी नसल्याचे आढळून आल्याने हा अर्ज अवैध ठरवण्यात आला.
याशिवाय माजी समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम यांनी दाखल केलेल्या चार उमेदवारी अर्जांपैकी एक अर्ज छाननीत बाद झाला आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०२६ असून, त्या तारखेपर्यंत किती उमेदवार रिंगणातून माघार घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
छाननीनंतर रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विविध गटांतील वैध उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे :
वाटद जिल्हा परिषद गट –
सौ. संज्योत सुवेश चव्हाण (शिवसेना उबाठा), उषा राजेश सावंत (शिवसेना), रुपाली श्रीधर पवार (अपक्ष), सौ. राखी रामदास पालशेतकर (अपक्ष)
खालगाव जिल्हा परिषद गट –
विनोद हरिश्चंद्र शितप (शिवसेना उबाठा), महेश शांताराम म्हाप (शिवसेना), सचिन कृष्णा पाचकुडे (अपक्ष), वैभव प्रज्ञा प्रभाकर यादव (वंचित बहुजन आघाडी)
कोतवडे जिल्हा परिषद गट –
उत्तम उद्धव मोरे (शिवसेना उबाठा), राजेश यशवंत साळवी (शिवसेना), साधना राजेश साळवी (अपक्ष), नितीश कृष्णा गैमार (मनसे), लक्ष्मीकांत रामचंद्र मयेकर (काँग्रेस)
झाडगाव (महानगरपालिका बाहेर) गट –
सौ. श्रद्धा दीपक मोरे (शिवसेना), सौ. आस्था अमित धांगडे (शिवसेना उबाठा)
खेडशी जिल्हा परिषद गट –
हर्षदा भिकाजी गावडे (शिवसेना), स्मिताली निलेश नार्वेकर (शिवसेना उबाठा), सौ. सुचिता संदीप नाचणकर (अपक्ष)
हातखंबा जिल्हा परिषद गट –
मुकुंद सुजाता यशवंत सावंत (वंचित बहुजन आघाडी), परशुराम मारुती कदम (अपक्ष), सुयोग नंदकुमार कांबळे (शिवसेना), सुनील गोविंद कांबळे (अपक्ष)
नाचणे जिल्हा परिषद गट –
शशिकांत नारायण बारगोडे (शिवसेना उबाठा), प्रकाश धोंडू रसाळ (शिवसेना)
कर्ला जिल्हा परिषद गट –
विकास कृष्णा भातडे (शिवसेना उबाठा), महेंद्र श्रीकृष्ण झापडेकर (शिवसेना), अमर सुरेश कीर (अपक्ष)
गोळप जिल्हा परिषद गट –
नंदकुमार नारायण मुरकर (शिवसेना), उदय विनायक बने (अपक्ष), विनोद मधुकर शिंदे (अपक्ष)
पावस जिल्हा परिषद गट –
ॲड. महेंद्र मांडवकर (शिवसेना), रविकिरण धर्माजी तोडणकर (शिवसेना उबाठा), सचिन नथुराम गिजबिले (अपक्ष), संदीप शशिकांत शिंदे (अपक्ष)
छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज माघारीच्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अंतिम लढतीचे चित्र २७ जानेवारीनंतर स्पष्ट होणार आहे.








