SRK तायक्वांदो क्लबच्या स्वरा साखळकरची घवघवीत कामगिरी : CHI जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कास्यपदकाची कमाई

रत्नागिरी, दि. १४ :- रत्नागिरी येथे पार पडलेल्या १९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज पुमसे व क्युरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत SRK तायक्वांदो क्लब, रत्नागिरी येथील सुवर्णकन्या खेळाडू स्वरा साखळकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्णपदके व १ कास्यपदक पटकावले.

ही स्पर्धा रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली. जिल्ह्यातील सुमारे ७०० नामवंत खेळाडूंमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत स्वरा हिने आपल्या कौशल्याचे, चिकाटीचे आणि मेहनतीचे दर्शन घडवले.

स्वरा हिने आजपर्यंत तायक्वांदो या क्रीडा प्रकारात एकूण ६१ पदकांची कमाई केली असून त्यामध्ये ३८ सुवर्ण, १५ रौप्य आणि ८ कास्य पदकांचा समावेश आहे. ही कामगिरी तिच्या सातत्यपूर्ण सरावाचे व समर्पणाचे फलित असल्याचे क्रीडाप्रेमींनी गौरवोद्गार काढले आहेत.

या यशामागे SRK तायक्वांदो संस्थेचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर यांचे मार्गदर्शन तसेच तिच्या आई-वडिलांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले. स्वरा ही नगरपरिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

तिने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोटे सर, क्रीडा शिक्षक श्री. शेंडगे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप, तालुका समन्वयक विनोद मयेकर, महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष श्री. व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत तसेच SRK तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय पालकवर्ग, क्रीडाशिक्षक, संस्थेचे संचालक, तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी व समस्त पालकांनीही स्वराच्या यशाचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा