संगमेश्वर, दि. १७ (अमृतराव जाधव) : खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत खूनाची घटना घडली होती. आरोपीने बंदुकीची गोळी झाडुन एका इसमाचा खून केला होता. हि बाब स्टेशनला नोंद होताच तपासाची चक्रे वेगाने फिरली. या खूनाच्या तपासाची जबाबदारी कोसुंब गावचे राकेश जाधव यांचेवर होती.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राउत,व अंमलदार अशा पथकाने खेड शिवापूर येथे आरोपी व साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडील २ गावठी पिस्टल व २ जिवंत राउंड जप्त करण्यात आले.
दोन महिन्यापूर्वीच 47 लाख रोख रक्कम रॉबरी च्या केस मध्ये चोरट्या सहित 47 लाख रिकव्हर केल्यामुळे संपूर्ण पुणे शहरात BEST DETECTION (उत्कृष्ट गुन्हे तपास) म्हणून मा. श्री रितेश कुमार सर , पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या कडून गौरविण्यात आले.
हे वृत्त प्रसिद्घ होताच कोसुंबवासियांनी तपास अधिकारी राकेश जाधव यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. लवकरच जाधव यांचा गावातर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे.








