रत्नागिरी, दि. १७ : त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “एक रात्र निळ्या पाखरांची…” जिल्हास्तरीय जलसा गीतगायन स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडली. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र (रत्नागिरी), धम्मक्रांती कलामंच रत्नागिरी व विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
विश्व समता संस्थेचा २० वा पुरस्कार वितरण सोहळा व रत्नागिरी जिल्ह्यातील जलसाकार कलाकारांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा भव्य सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आला. शुभगंधा मंगल कार्यालय, मयुरबाग लोवले (ता. संगमेश्वर) येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण सोहळा तर सायंकाळी ८.१५ वाजता जलसा गीतगायन स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुनिल शंकर जाधव (पुणे) यांनी भूषविले.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांतील जलसा मंडळांनी सहभाग नोंदविला होता. उत्कृष्ट सादरीकरणामुळे जनसेवा संगीत जलसा मंडळ, आंबव (पोंक्षे), ता. संगमेश्वर यांनी विशेष ठसा उमटविला. त्यांच्या कलात्मक सादरीकरणाची परीक्षक व प्रेक्षकांकडून विशेष दखल घेण्यात आली.
या स्पर्धेत जनसेवा संगीत जलसा मंडळास
उत्तेजनार्थ पारितोषिक तसेच विशेष ढोलकी वादक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
जनसेवा संगीत जलसा मंडळ (आंबव – पोंक्षे) संघरचना :
- जलसा निर्माते : कालकथित बाळाराम लक्ष्मण जाधव
- निवेदन : आयु. सिद्धार्थ शिवराम जाधव
- मुख्य गायक : आयु. अजित शिवराम जाधव
- ढोलकी वादक : आयु. संदीप कदम
- हार्मोनियम : आयु. अमरदीप कदम
- कडी वादक : आयु. अनिकेत अनिल जाधव
- कोरस :
- आयु. मयूर जाधव
- आयु. संगपाल जाधव
- आयु. सचिन जाधव
- आयु. रोशन जाधव
- कुमार : आर्यन जाधव
- कुमार : निखिल सुजित जाधव
या यशाबद्दल जनसेवा संगीत जलसा मंडळावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील जलसाकार कलाकारांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.








