पीएचडी चा संकल्प करणाऱ्या ‘शगुण मिश्रा’ची फिल्मिदूनियेत प्रवेश

फिल्मी दुनियेचे आकर्षण म्हणजे एक प्रकारचे वेड असते. हिंदी सिनेमा सृष्टीत देशभरातील गाव खेड्यातून सिनेकलाकर होण्याच्या मोहातून अभिनेत्री व अभिनेता बनण्यासाठी आपल सर्वस्व पणाला लावून मुंबई या स्वप्न नगरीच्या दिशेने येत असतात. यात काही लोक यशस्वी होतात तर काहींच्या पदरी अपयश येते मात्र तरी ही या चंदेरी दुनियेत कधी तरी यश मिळेल या अपेक्षेने प्रयत्न स्ट्रगल सुरू असतात. या चित्रपट इंडस्ट्री मध्ये बरेच कलाकार अनपेक्षितपणे आले आहेत. त्यापैकी एक नवखी अभिनेत्री सगुण मिश्रा हीचा समावेश झाला आहे. पीएचडी चा संकल्प करणाऱ्या शगुण मिश्रा ची फिल्मिदूनियेत अचानक प्रवेश झाला आहे. रणबीर सिंग ला पाहण्यास गेलेल्या सगुण मिश्रा ची अभिनेत्री म्हणून निवड होताच
शगुण मिश्रा ला अभिनेता अन्नू कपूर च्या हमारे बारा या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते. हा सर्व योगायोग शगुण मिश्रा बाबत घडला आहे. मुंबईतील अत्यंत शिस्तप्रिय कुटुंबात वाढलेली शगुण मिश्रा चे वडील प्रणव मिश्रा हे प्रोफेसर म्हणून निवृत्त झाल्या नंतर आता वकिली करत असून आई मृणालिनी मिश्रा ह्या सुद्धा उच्च शिक्षित आहेत.
रणबीर सिंग च्या कार्यक्रमात गेलेल्या शगुण मिश्रा ला चित्रपटाची  संधी
यशराज स्टुडिओ मध्ये नेट फिलिक्स च्या पास मार्फत आपला आवडता कलाकार रणबीर सिंग ला पाहण्याची संधी मिळणार म्हणून गेलेल्या शगुण मिश्रा ला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की ती चित्रपटात काम करेल मात्र तिला पाहून डायरेक्टर कमल चंद्रा यांनी चित्रपटात काम करशील का ही विचारणा करतात शगुण च्या आयुष्यात 390 च्या डिग्री ने चक्र फिरली, नुकतेच शगुण चे एम एस सी पूर्ण झाले होते आता पीएचडी चा संकल्प केला होता अशात अचानक चित्रपटात काम करण्याची विचारणा झाली त्यात तिला काय करावं सुचेना झाले अखेर आई वडिलांच्या सहमती दर्शवल्या नंतर शगुण ने होकार भरला पुढे ऑडिशन मध्ये पास झाल्यानंतर मुख्य भूमिका असलेल्या अन्नू कपूर यांच्या हमारे बारा या हिंदी चित्रपटात झोया ह्या पात्रासाठी शगुण मिश्रा ची निवड झाली. अन्नू कपूर चा हमारे बारा हा हिंदी चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला यात शगुण मिश्रा ने अन्नू कपूर च्या मुलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सगुण च्या कामाची सर्वांनी प्रशंसा केली आहे. दिल्ली येथे फूटवेअर डिजाइन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (FDDI) भारत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल फॅशन शो मध्ये नवख्या कलाकारांच्या रुपात विशेष अतिथी म्हणून शगुण मिश्रा ला निमंत्रित करण्यात आले होते. या फॅशन शो मध्ये तिने भाग घेऊन रॅम्प वॉक केला. त्यावेळी तिला हमारे बारा या चित्रपटासाठी आणि फॅशन शो मध्ये विशेष भाग घेतल्याबद्दल अवॉर्ड देण्यात आला. नुकतेच तिने आफरिन या म्युजिक व्हिडिओ चे शूटिंग पूर्ण झाले आहे. दरम्यान तिने एक नवीन चित्रपट आणि जिओ (jio) सिनेमाचा ओटीटी वेब सिरीज  साईन केले आहे. ही सर्व काम निवडताना शगुण कडून चांगली कथा आणि प्रभावी भूमिका पाहूनच होकार दिला जात आहे. मुंबई आणि उत्तर प्रदेशच्या बलिया येथील मित्रमंडळी व हितचिंतकानी तिच्या या चित्रपटातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा