महामार्गावर सोनवीपुल नाका आणि शास्त्रीपुल या ठिकाणी महामार्गावर होतेय कोंडी

देवरुख, दि. १० (प्रतिनिधी):   मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवीपुल नाक्यात वाहतूक कोंडी होत असून अवजड वाहने या वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनचालकांचे कंबरडे अक्षरशः मोडले असून प्रचंड धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे ठेकेदार कंपनी किंवा वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का असावा आला प्रवासी आणि वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे.
सद्यस्थितीमध्ये सोनवी पुलाचे काम सुरू असल्याने महामार्गाची वाहतूक सुरळीत होईल अशा प्रकारे नाक्यामध्ये व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता वाहतूक सुरू असल्याने सोनवी नाक्यामध्ये वाहने अडकून पडत आहेत. तसेच या ठिकाणी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे एखादी दुर्घटना होण्याचा संभव व्यक्त होत आहे.
महामार्गावरून सोने पुलाच्या अलीकडे डाव्या साईडला वळणारी कोल्हापूरकडे जाणार्या वाहनांनाही या कोंडीचा फटका बसत आहे. गेले अनेक दिवस वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वर्ग हैराण झाला आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे .
सोनवी पुलावर वारंवार खड्डे पडलेले असतानाही खड्डे बुजवले जात नसल्याने दुचाकी स्वारासह वाहनांचा अपघात होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अवजड वाहनांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर धुळीमुळे वाहने चालवताना डोळ्यात धुळ जात आहे. सगळी धुळ अंगावर तोंडात, डोळ्यात जात असल्याने आरोग्याचा प्रश्न येरणीवर आला असल्याने जीव मुठीत धरून वाहने चालवावे लागत आहे. एका बाजूला चौपदरी करण्याची कामे सुरू आहेत पण दुसऱ्या बाजूला वाहने वाहन चालक आणि प्रवासी वर्गाला गृहीत न धरता रस्त्याचे काम सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. किमान वाहने नेण्यासाठी सुयोग्य एकेरी मार्ग तरी असावा एवढीच माफक इच्छा वाहन चालकांची सध्याला आहे. मात्र याकडे महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार कंपनी अक्षरशः दुर्लक्ष करत आहे.
गेल्या मे महिन्यापासून सातत्याने वर्तमानपत्राच्या माध्यमातून आवाज उठवून देतील या यंत्रणेला काडीचा फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. उड्डाणपूल किंवा मार्ग पूर्ण होणार नसेल तर याचा विचार करून किमान एक मार्गिका तर सुशिक्षित असावी हीच भूमिका वृत्तपत्र प्रतिनिधींनी वारंवार घेतली होती.
मात्र तसे कोणतेच उपाय न करण्यात आल्याने पावसाळ्यात खड्ड्यातून डबक्यातून पाण्यातून चिखलातून जीवना प्रवास करावा लागला तर आता त्याच खड्ड्यातून धुळीच्या डोळ्यातून पुन्हा प्रवास करावा लागत आहे असा जीवघेणा करावा लागणारा प्रवास महामार्गाच्या अधिकाऱ्यांना करावा लागला तरच त्यांना सर्वसामान्यांचे दुःख कळणार आहे. लोकप्रतिनिधी असो वा वरिष्ठ अधिकारी असो एसी गाडीतून प्रवास करणाऱ्यांना याचे दुःख काय असे संतप्त बोल महामार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक प्रवासी वर्गातून उठत आहेत.

आणखी वाचा