साखरपा, दि. १३ (प्रतिनिधी): विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षप्रवेशाचा जोरदार तडाका किरण सामंत यांनी लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघात लावला आहे. राजन साळवी यांना धक्का देत कोंडगाव मधील शेकडो पदाधिकारी आणि उबाठा गटाचे शिवसैनिक यांनी किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत मशाल बाजूला ठेवत धनुष्यबाण हाती घेतले आहे.
साखरपा तील कोंडगाव हा उबाठा गटाचा बालेकिल्ला असून त्या बालेकिल्ल्यामध्ये किरण सामंत यांनी सुरुंग लावला आहे. आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का देत येथील निष्ठावंत शिवसैनिक किरण सामंतांच्या मार्गदर्शनाखाली आता शिवसेनेमध्ये प्रवेश करून कामाला सुरुवात करणार आहेत
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती उबाठा गटाचा या भागामध्ये सुपडा साफ करण्याचं काम किरण सामंत यांनी केला आहे. किरण सामत हे विकासाचे नेतृत्व आहे त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्यांच्या कामावर प्रेरित होऊन उबाठा शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.








