देव, घैसास, कीर महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय पत्रलेखन, ईमेल लेखन कार्यशाळा

रत्नागिरी दि. १८ (गौरव मुळ्ये) : भारत शिक्षण मंडळाच्या देव,घैसास,कीर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विभागाकडून दि. १७ ऑक्टोबर रोजी पत्रलेखन, ईमेल लेखन या अभ्यासक्रमावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

विद्यार्थ्यांना शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा पुस्तकापुरता मर्यादित राहतो आणि त्यामुळे ज्यावेळी दैनंदिन जीवनात त्याचा वापर करावयाचा असतो त्यावेळी विद्यार्थ्यांना कठीण जाते. म्हणूनच विद्यार्थ्यांना सध्या पत्रलेखन व ई-मेल लेखन याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन स्टूडन्ट इंग्लिश लिटररी फोरम या इंग्रजी विभागामार्फत राबवण्यात आले होते.

या कार्यशाळेमध्ये उपप्राचार्या व इंग्रजी विभागप्रमुख सौ.वसुंधरा जाधव यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये पत्राचे विविध प्रकार, पत्र मांडण्याचे परंपरागत व आधुनिक प्रकार, विविध पत्रासाठी विषयानुसार कागदांची व लखोट्यांची निवड व पत्राच्या कागदाच्या घड्या व लखोटा भरणे या संदर्भात संपूर्ण माहिती दिली व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. ईमेलचे सध्याचे महत्व सांगून मुलांनकडून ई-मेल प्रात्यक्षिक घेतले.

या कार्यशाळेस प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या  विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेस महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आणखी वाचा