चिपळूण, दि. १७ (प्रतिनिधी): नाम फाउंडेशनच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्ताने चिपळूण नगर परिषद व नाम फाउंडेशन चिपळूणचे वतीने शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता खेडेकर क्रिडा संकुल व पार्किंग येथे चिपळूण नगरपरिषदेचे कार्यक्षम मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
२०२१ च्या महापूरा नंतर चिपळूण ची वाशिष्ठी व शीव नदी ही गाळाने भरलेली असलेने नदीचीची वहन क्षमता ६०% कमी झाली त्यामुळे अति पर्जन्यव्रुष्टी झाल्यास नदी पात्राचे पाणी नदी बाहेर शहरात व लगतच्या परिसरात घुसुन महाप्रलय आला या मुळे चिपळूण वासियांची कोट्यावधी रुपयांची हानी झाली. नदीतील गाळ काढण्यासह विविध मागण्या घेऊन चिपळूण बचाव समितीने मोठे आंदोलन छेडले अखेर या आंदोलनाला यश येऊन शासनाने गाळ काढण्यास निधीची तरतूद केली त्या वेळी नाम.फाउंडेशन चिपळूण करांच्या मदतीला धावून आले. २०२२ व २०२३ या काळात नाम.फाऊंडेशन मोठ्या प्रमाणात मशिनरी देवून रात्रंदिवस काम चालू ठेवले. नाम फाऊंडेशन इतकेच करुन थांबले नाही तर व्रुक्ष तोडी मुळे जमिनीची धूप होते तसेच भूस्खलन.होऊन पात्रात गाळ येतो याकरोता वाशिष्ठीच्या पाणलोट क्षेत्रातील ४२ ग्रामपंचायती मध्ये खड्डे मारुन सुमारे १५ हजार व्रुक्षांची लागवड केली. या वर्षी नाम फाउंडेशन कडून मोठ्या प्रमाणात गाळ काढणेस मशिनरी देण्यात येणार आहे तसेच ५० हजार देशी व्रुक्षांची लसगवड करण्यात येणार आहे.
नाम फाऊंडेशनच्या वर्धापन दिना निमित्त व्रुक्षारोपणाच्या कार्यक्रमात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी नामच्या कामाची प्रशंसा केली तसेच चिपळूण नगरपरिषद हद्दीतील नदीतील गाळ काढणे व विविध ठिकाणी करित असलेल्या व्रुक्षारोपण कार्यक्रमा बद्दल आभार मानले या वेळी नाम फाउंडेशन चे कपकण समन्वयक समिर जानवलकर व शाहनवाज शाह यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच केक कापून वर्धापन दिन साजरा केला यावेळी माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले बचाव समितीचे बापू काणे अरुण भोजने किशोर रेडीज, अजित जोशी, सह्याद्री निसर्ग मंडळाचे भाऊ काटदरे, ग्लोबल चिपळूणचे रामशेठ रेडीज, माजी नगरसेवक महंमद फकीर , प्रुथ्वीराज पवार, मंदार चिपळूणकर , संभाजी ब्रिगेडच्या निर्मला ताई जाधव, माजी नगरसेविका सफा गोठे, स्वाती भोजने, रमण डांगे, अंकुश आवले, अॅक्टिव्ह ग्रुपचे कैसर देसाई निसर्ग प्रेमी समिर कोवळे, विलास महाडिक गुरुजी रुही खेडेकर, अशोक भुस्कुटे , प्रसाद साडविलकर आदि मान्यवर उपस्थित होते.








