रत्नागिरी दि. २४ (जिमाका) : २ (सेकंड) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनीटतर्फे १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील कोकण शौर्य हे मेनु नौकाभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा सांगता समारंभ आज भगवती जेटी येथे जिल्ह्याचे इंडियन कोस्ट गार्डचे कमान अधिकारी, डीआयजी शत्रुजित सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्वच्छ कोकण सुरक्षित कोकण असा संदेश देत ही मोहीम राबविण्यात आली. नौका वल्हवत व वाऱ्याच्या दिशा सांभाळत आज सकाळी तीन नौका व ६० छात्र भगवती बंदर येथे पोहोचले. त्यांचे स्वागत डीआयजी शत्रुजित सिंग यांनी केले.
याप्रसंगी डीआयजी शत्रुजित सिंग म्हणाले, आज एनसीसीच्या छात्रांनी शौर्य मोहीम यशस्वी केली आहे. भविष्यात या छात्रांना भारतीय सैन्य दल, कोस्टगार्डच्या गणवेशात बघायला आवडेल. गतवर्षीच्या प्लास्टिक मुक्त समुद्र या पथनाट्याची अजूनही आठवण येत आहे. स्वच्छ सागर, सुरक्षित सागर हे आजचे पथनाट्य अतिशय प्रभावी वाटले. ज्यामुळे किनाऱ्यावरच्या लोकांचे नक्कीच प्रबोधन झाले आहे. ते लोक कुटुंब, मित्रमंडळींना सांगून हा संदेश देतील.
मोहिमेदरम्यान भगवती बंदर ते रनपार, पावस, पूर्णगड, आंबोळगड, विजयदूर्ग आणि देवगड परत याच मार्गाने रत्नागिरी असा मार्ग समुद्रात पार करण्यात आला. यात नेव्ही, आर्मी, एअरफोर्सच्या छात्रांचा समावेश होता.
याप्रसंगी २ महा
राष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेश कुमार (भारतीय नौसेना) यांनी या मोहिमेसंदर्भातील माहिती सांगितली. लाटा व वाऱ्याशी सामना करत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, भरती ओहोटी, वाऱ्याचा विचार करून नौका वल्हवत पुढे जाणे आणि समुद्रातील कोणत्याही संकटाशी सामना करण्याकरिता सज्ज राहणे, यासाठी ही मोहीम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे एन
बेस्ट पुलर म्हणून मुलांमधून अभिनव पाले आणि मुलींमधून तुषारा तुमरपल्ली हिची निवड केली. तिला शत्रुजित सिंग यांच्या हस्ते सन्मानित केले. तसेच शत्रुजित सिंग यांना युद्धनौकेची प्रतिकृती के. राजेशकुमार यांनी भेट दिली.








