रत्नागिरी, दि. 16 (जिमाका) : संगमेश्वर तालुक्यातील मौजे आंबेड बु. व मौजे – कोळंबे येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत उपस्थित शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे, फळपिक विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका महत्त्व, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, शेतकरी अपघात विमा इत्यादी योजनेंबाबत मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सुहास माईनगडे, शरद घोबाळे, प्रशांत मुळये व इतर ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या आणि दापोली तालुक्यातील मौजे हतिफ येथेही हा कार्यक्रम झाला.








