ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातून ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांचा व्यापक प्रसार होत असल्याने ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे. अनेक मान्यवरांनी याठिकाणी भेटी देऊन येथील सुविधांचे, त्यातही मुख्यत्वे येथील समृध्द ग्रंथालयाचे व चरित्र छायाचित्र दालनाचे कौतुक केले असून देशी-परदेशी पर्यटकांनीही आगळेवेगळे स्मारक म्हणून गौरव केला आहे.