नवी मुंबई, दि. 18 : कोकण विभागात दि.18 सप्टेंबर, 2023 रोजी सरासरी 17.0मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद ठाणे जिल्हयात 32.7मि.मी. झाली आहे. कोकण विभागात आत्तापर्यंत एकूण 2718.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे ठाणे-32.7मि.मी.,पालघर-16.7मि.मी, रायगड-19.3मि.मी., रत्नागिरी-10.0मि.मी., सिंधुदुर्ग-12.3 मि.मी.








