टीम इंडियाकडून चौघांची दमदार अर्धशतकं, ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने शानदार विजय

मोहाली, दि. २२ (प्रतिनिधी): शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कॅप्टन केएल राहुल या चौघांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेत दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 48.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 281 धावा केल्या. कॅप्टन केएल राहुल याने विजयी सिक्स खेचला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. शुबमन गिल त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्या ३४ डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे बाबर आझम पहिल्यादा होता. गिलने आतापर्यंत ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८१३ धावा केल्या आहेत, तर बाबर आझमने १६८९ धावा केल्या आहेत. वनडेच्या पहिल्या ३४ डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हाशिम आमला पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने १८३४ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम, घरच्या मैदानावर केला खास पराक्रम :
शुबमन गिलने घरच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. गिल मोहालीत पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आला होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला.
शुबमन गिल त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्या ३४ डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे बाबर आझम पहिल्यादा होता. गिलने आतापर्यंत ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८१३ धावा केल्या आहेत, तर बाबर आझमने १६८९ धावा केल्या आहेत. वनडेच्या पहिल्या ३४ डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हाशिम आमला पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने १८३४ धावा केल्या आहेत.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन) डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरुन ग्रीन, जोस इंग्लिस (विकेटकीपर), मार्क्स स्टोयनिस, एम शॉर्ट, सिन एबोट आणि एडम झॅम्पा.

आणखी वाचा