महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी भारतभर आंदोलने /निदर्शने सरकारचे लक्ष वेधणेसाठी करण्यात येत आहेत. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकामध्ये हे विहार बांधण्यात आले आणि इसवी सन पाचव्या शतकामध्ये या विहाराचे नूतनीकरण करण्यात आले. यानंतर या देशातून बौद्ध धम्म नष्ट करण्यात आला सन 1 893 साली अनाकारिक धम्मपाल यांनी या विहारात बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली मात्र विहाराचा ताबा महंताने घेतला होता. विहाराचे नूतनीकरण चालू होते त्याचवेळी मुसलमानांचे राज्य होते मुस्लिम राजा मोहम्मद शहा यांनी फर्मान काढून हे विहार मंदिर आहे असे समजून फर्मान काढले त्यामुळे त्या ठिकाणी शंकराची पिंड प्रस्थापित केली गेली. तेव्हापासून मंदिरातील पुजारी महंत शंकराच्या पिंडीची पूजा आर्चा करू लागले. हा पुजारी म्हणजे शैव-धर्माचा पुजारी यालाच महंत असे म्हणतात या महंताचे नाव गोसावी गिरी घमंडी आहे.
अनागारीक धम्मपाल यांनी सन 1893 मध्ये जपान देशांमधून बुद्ध मूर्ती आणली आणि त्या विहाराच्या दुसऱ्या मजल्यावर प्रस्थापित केली त्यावेळी महंतांचे गुंड त्या ठिकाणी आले आणि तेथील बुद्ध मूर्ती फेकून दिली आणि अनागारीक धम्मपाल यास मारहाण केली व त्यांना बुद्धगयेतून जाण्यास सांगितले न गेल्यास मारण्याची धमकी दिली त्याचवेळी अनागारीक धम्मपाल श्रीलंकेत निघून गेले तेथून त्यांनी ‘भिक्कू सुमंगल’ यांना बोलावून आणले त्यांच्यासोबत अमेरिकेतील रिटायर जनरल ‘स्टील अल्कॉट’ हे होते. ते तिघे मिळून ब्रह्मदेशात गेले तेथे जाऊन ” भंते चंद्रमणी” यांना भेटले भंते चंद्रमणी त्याच वेळी श्रामनेर झाले होते. भंते चंद्रमणी यांना अनागारिक धम्मपाल यांनी विनंती केली की भारतामध्ये आमच्या सोबत बुद्धगयेला चला बुद्धगया येथील विहारावर तेथील महंत कब्जा करीत आहेत, महाबोधी विहारावर ताबा सांगीत आहेत त्यामुळे सात आठ लोक बुद्धगया येथे आले व हे लोक धर्म शाळेमध्ये राहायला लागले तरीही त्यांचेवर महंताच्या लोकांनी नजर ठेवली त्यांना त्रास देऊ लागले विहारांमध्ये वंदनेसाठी गेल्यावर त्यांना मारहाण करून हाकलून देत असत, मारामारी करत असत या आठ जणांपैकी दोन लोकांना महंताच्या लोकांनी ठार मारून टाकले होते (संदर्भ चंद्रमणी चरित्र) याबाबत डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट बुद्धगया येथे अनागारिक धम्मपाल यांनी केस दाखल केली होती.
अनाकारिक धम्मपाल यांना गयेमध्ये न्याय मिळाला नाही म्हणून ते कलकत्ता हायकोर्ट मध्ये गेले (कलकत्ता बंगाल प्रांत) कलकत्ता हायकोर्ट मध्ये त्यांना अर्धा न्याय मिळाला. कोर्टाने त्यांना स्टेटस को दिला (जैसे थे परिस्थिती) म्हणजे दोघांनीही पूजा करावी असा न्याय दिला.
त्याच कालावधीत त्या ठिकाणी हे बुद्ध विहार बुद्धाचेच होते भगवान बुद्धांना या ठिकाणी सम्यक संबोधी प्राप्त झाली अशा प्रकारचे मत सण 1811 साली ” फ्रान्सिस बुचनन ” यांनी व्यक्त केलेले आहे तसेच सम्राट अशोकाने हे विहार बांधलेले होते असेही मत त्यांनी व्यक्त केलेले आहे. फ्रान्सिस बुचनन हे जगातील पहिले महान वनस्पती शास्त्रज्ञ आहेत वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना जमिनीचा कस तपासणीसाठी मातीशी संबंध यायचा, माती उकरावी लागत असे मातीचे उत्कलन करावे लागत असे त्यावेळी त्या उत्खननामध्ये बुद्धकालीन अवशेष सापडले आहेत त्यावरून त्यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे.
त्याचप्रमाणे एडविन अर्नोल्ड यांनी या ठिकाणाला 1879 मध्ये भेट दिली व त्या ठिकाणी भगवान बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली आहे असे त्यांनी सांगितले. आणि लाईट ऑफ अशिया आशिया खंडाचा प्रकाश नावाचा काव्यखंड प्रकाशित केला. एडविन आर्नोल्ड हे पुणे येथील डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपल होते (इंग्रजांनी नियुक्त केलेले) त्यांनी विहारला भेट दिली वारंवार जाऊन आले महाबोधी विहारची दुर्दशा पाहून त्यांचे मन दुखावले त्यामुळे तेथून ते जपानला गेले व जपानच्या लोकांना विनंती केली की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली आहे ते विहार महंताने बळकावले आहे त्यामुळे ते विहार ताब्यात मिळण्यासाठी भारताला सहकार्य करावे अशी विनंती केली
त्याचप्रमाणे ब्रह्मदेशाचा राजा मिंटोमिन व राजा थिबा यांनी या विहारासाठी संघर्ष करून विहाराच्या पुनर्बांधणीसाठी आणि व्यवस्थापनासाठी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत.
सध्या हे विहार बोधगया टेम्पल मॅनेजमेंट अॅक्ट 1949 च्या अंतर्गत व्यवस्थापित आहे या विहाराच्या कमिटीवर चार हिंदू आणि चार बौद्ध प्रतिनिधी आहे व गया जिल्ह्याचा हिंदू असलेला कलेक्टर/ जिल्हाधिकारी हा चेअरमन आहे म्हणजेच मेजॉरिटी हिंदूंचीच आहे
विहार बौद्धांचे असल्यामुळे या ठिकाणी गैर बौद्ध या कमिटीवर घेणे कायदा विसंगत आहे कारण बौद्ध धम्माच्या शिकवणीप्रमाणे अनुकरण करीत नसून बौद्ध धम्माचे विडंब करीत आहेत, विकृतीकरण करीत आहेत, मूर्तीचे विद्रूपीकरण करीत आहेत.
ज्याप्रमाणे मशिदीचे व्यवस्थापन मुसलमानांकडे आहे चर्चचे व्यवस्थापन ख्रिश्चनांकडे आहे त्याचप्रमाणे बौद्ध विहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे असणे गरजेचे आहे हे बदलण्यासाठी सन 2012 मध्ये बिहार राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी प्रस्ताव मांडला होता परंतु तिथल्या सभागृहाने तो प्रस्ताव फेटाळून लावला म्हणून भारतातील बौद्धांची अशी मागणी आहे की, नाही महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट अॅक्ट 1949 हा रद्द करण्यात यावा व महाबोधी विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांकडे देण्यात यावे. याच मागणीसाठी दिनांक 12 फेब्रुवारी विषय 25 पासून भारतातील व भारताच्या बाहेरील म्हणजे जगातील बौद्ध भिक्खू धर्मगुरू बौद्ध उपासक यांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला भारतातील सर्व बौद्धांचा पाठिंबा आहे हे या आंदोलनावरून दिसून येते.
भारतातील बौद्ध धर्माच्या विरोधकांनी बौद्ध धर्म नष्ट करून टाकला आहे, बुद्धाच्या विहाराची जाळपोळ केली आहे, बौद्ध साहित्य जाळून टाकले आहे, बौद्ध भिकूंची कत्तल केली आहे व बौद्ध धर्म नष्ट केला आहे याच धर्माचे पुनर्जीवन करून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बुद्धाच्या धम्माचे पुनर्जीवित केले आहे व याच धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आहे. आज धम्माचा प्रचार व प्रसार बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून सर्व भारतभर करण्यात येत आहे तेव्हा या महाबोधी विहाराचे व्यवस्थापन परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सरकारी दप्तरी नोंद असलेल्या अधिकृत अशा ‘ दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या अधिकृत संस्थेकडे द्यावे असे सुचित करून सर्व पुराव्यांचा आधार घेऊन आणि संपूर्ण भारतीय बौद्धांच्या भावनांचा विचार करून विहार राज्य सरकारला आणि भारत सरकारला विनंती करण्यात येते की, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती पूर्वी लवकरच हा प्रश्न सोडवण्यात यावा ही विनंती.
ॲड .डॉ. रमेश वि. कांबळे
देवधे, ता लांजा,रत्नागिरी
मोबा. 9022634943