रत्नागिरी दि. 8 (जिमाका): एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी-२ अंतर्गत अंगणवाडी केंद्र, चाफे वरचीवाडी, खरवते, कळझोंडी लोहारवाडी येथे मदतनीस रिक्त पद भरावयाचे आहे. तरी इच्छुक स्त्री स्थानिक उमेदवारांनी दिनांक १७ ऑक्टोबर पर्यंत सायं. ५ वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी २, शंकेश्वर पार्क, बी विंग, रुम नं. ७, जिल्हा परिषद शेजारी रत्नागिरी या पत्यावर अर्ज सादर करावेत. आवश्यक माहितीसाठी सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी ९.४५ ते ६.१५ या वेळेत संपर्क साधावा.
१)शैक्षणिक पात्रता :- अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण ( राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहिल. ( गुणपत्रक आवश्यक)
२)वास्तव्याची अट :- ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे मधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
३) वयाची अट :- अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी (By Nomination) वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहिल. विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहील.
४) विधवा/अनाथ असल्याबाबत दाखला (असल्यास दाखला)
५) लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये
६) जातीचा दाखला असल्यास आवश्यक
७) अंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक
८) शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक (MSCIT)
विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्वीकारले जातील. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही.








