निसर्गरम्य चिपळुण ; संगमेश्वर गृपचा शेखर निकम याना पाठिंबा

संगमेश्वर दि. १६ (प्रतिनिधी)::– विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहचलेला असतानाच मतदारसंघातुन मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे समर्थन मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. अशातच कोंकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर रेल्वे स्थानकातील विविध समस्या आणि गाड्यांच्या थांब्यासाठी संघर्ष करणा-या निसर्गरम्य चिपळुण;संगमेश्वर गृपने शेखर निकम याना पाठिंबा जाहिर केला आहे.
पाठिंब्याचे पत्र काल गृपचे प्रमुख श्री संदेश जिमन यानी नुकतेच श्री शेखर निकम याना दिले. या प्रसंगी गृपचे प्रमुख संदेश जिमन यांच्यसह  दिपक पवार, संतोष पाटणे; जगदिश कदम, अशोक मुंडेकर आदि उपस्थित होते.
या संबधी संदेश जिमन यानी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहीती  दिली आहे. ….
त्यानी पत्रकात म्हटले आहे की…..
निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर हा ग्रुप गेली ५ वर्षे संगमेश्वर रेल्वे प्रवाशांच्या मागण्या, सोई सुविधांसाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आला आहे. यासाठी काहीवेळा संघर्षही करावा लागला आहे. अशावेळी संगमेश्वर प्रवाशांच्या या संघर्षात स्थानिक आमदार म्हणुन  शेखर निकम हे नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहून वेळोवेळी आम्हाला साथ दिली. त्यामुळे आता पुन्हा महायुतीतर्फे निवडणुकीत उभे असलेले संगमेश्वर चिपळूण मतदार संघांचे लोकप्रिय विद्यमान आमदार श्री शेखर निकम सर याना गृपच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तशा आशयाचे पत्र सराना नुकतेच सुपुर्द करण्यात आले.
आमचा गृप राजकीय हेतुने प्रेरित निश्चित नाही; परंतु गेल्या ५ वर्षांचा अनुभव लक्षात घेवुन कोणत्याही प्रश्नावर सदैव मदतीचा हात पुढे करणा-या श्री शेखर निकम सरांसारख्या कार्यतत्पर लोकप्रतिनिधीची संगमेश्वर चिपळूण मतदार संघाला गरज आहे या हेतुनेच आम्ही त्याना जाहिर पाठिंबा देत आहोत.

आणखी वाचा