राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार ही काळया दगडावरची भगवी रेष ; कोकण विकास प्राधिकरण मजबूत करणार बॅकलॉग भरून काढणार ; ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है

रत्नागिरी, दि. १७ (विशेष प्रतिनिधी) : कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना आपण केली आहे. एमएसआरडिसी 500 कोटी एमआयडीसी 500 कोटी एमएमआरडी 500 कोटी व सरकारने हजार कोटी असे आपण मजबूत प्राधिकरण करतोय असं  सांगतो येथील आंबा,काजू बागायतदारांना बळ मिळेल. सिंधुदुर्ग पासून मुंबई पर्यंत एक्सप्रेस वे आपण करतोय कोकणचा बॅकलॉग भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे अशी गायक कोकणातील जाहीर सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावेळी महायुतीचा वचननामा दाखवत ‘ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ अशी घोषणा करत या पुढील काळात अनेक लोकाभिमुख योजना उद्योग रोजगार अनेक कामे करायचे आहेत अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली दापोली, गुहागर व सावंतवाडी या तीन ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या. यावेळी व्यासपीठावरती रामदास कदम, मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे,आमदार योगेश कदम गुहागरचे माजी आमदार विनय ना तू उमेदवार राजेश बेंडल, सावंतवाडी येथे मंत्री दीपक केसरकर, भाजपाचे जेष्ठ नेते खासदार नारायण राणे, कुडाळ मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे आदी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय या महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, कोकण निसर्गाने नटलेला प्रदेश आहे पर्यटनाला चालना मिळेल यासाठी कोस्टल रोड आपण करतोय कनेक्टिव्हिटी वाढली की कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने येतील. रेल, रोड, एअर ही कनेक्टिव्हिटी वाढते त्यावेळेला त्या भागाचा विकास होतो महायुतीचे सरकार येणार ही काळा दगडावरची भगवी रेष आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील सभांमध्ये व्यक्त केला.
त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात
आम्हाला खोके म्हणून जाणीवपूर्वक बदनाम करणाऱ्या पक्षप्रमुखांना पैसे खोक्यांमधून नाही तर कंटेनर मधून लागतात आणि हे मी नाही म्हणालो तर हे राज ठाकरे म्हणाले कंटेनर कुठे गेले कोणता देशात गेले याची सगळी माहिती सगळ्यांना आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा जोरदार समाचार घेतला.
जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याची घोषणा
बाळासाहेबांच्या युतीच्या सरकारने 1995 साली आदल्या सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवले होते तसेच भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात गुहागर येथील सभेत बोलताना केली आहे. आणि लाडक्या भावांनी बहिणींनी एकच काम सांगा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आलोय आणि जे म्हणतात ही योजना बंद करणार त्यांना सांगा कोणी माई का लाल आला तरी ही योजना बंद होऊ देणार नाही असा सज्ज इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे.
लाडक्या बहीण योजने संदर्भात आणि चौकशी करू आत मध्ये टाकू एकनाथ शिंदेला आत मध्ये टाकू अरे धमक्या कोणाला देता हा एकनाथ शिंदे आंदोलन करत मोठा झाला आहे संघर्षातून पुढे आलाय जेल बघून पुढ आलाय तुमच्या अशा या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावला आहे. तुम्ही मला हलक्यामध्ये घेऊ नका हलक्यामध्ये घेतलं म्हणून तुमच्या टांगा पलटी करून टाकला सरकार बदललं आणि म्हणून आमच्या सामान्य जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणल.
हे सरकार ‘देना बँक है लेना बँक नही ‘

सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले सरकार बदलले म्हणून आम्ही अनेक लोकाभिमुख योजना सुरू करू शकलो असं म्हणत आमचा हा आता वचननामा आहे तो दाखवत दाखवत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ असं म्हणत हे सरकार देणार आहे घेणार नाही ही ‘देना बँक लेना बँक नही ‘ आशा शब्दात विरोधकांचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे. अशी घोषणाच कोकणातील सभेत केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीच्या उमेदवारासाठी दापोलीत योगेश कदम गुहागर मध्ये राजेश बेंडल, रत्नागिरी येथील उमेदवार उदय सामंत, राजापूर येथे किरण सामंत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी याचे मंत्री दीपक केसरकर व कुडाळ मधून निलेश राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेण्यात आल्या. शिवसेना भाजपा राष्ट्रवादी या तिन्ही महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकसभेला कोकणाने आघाडीला स्थान दिले नाही याबद्दल कोकणवासियांच त्यांनी विशेष कौतुक केलं.

बहिणींना पैसे न देणाऱ्या सावत्र भावांना आता
आम्ही कधीही कोणाला खोटे आश्वासन देत नाही काँग्रेसच्या काळात निवडणुका झाल्यावर हात भरती करतात आमच्याकडे पैसे नाही सांगतात आणि प्रधानमंत्री पास मांगो असे म्हणतात. पण त्या विरुद्ध आपल्या सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात पट पटापट पैसे जमा करून मोकळे झालो निवडणूक झाली की पुढच्या हप्ताही तुमच्या खात्यात जमा होईल हा माझा शब्द आहे या योजनेवरून टीका करणारे सावत्र भाऊ काळ्या मांजरासारखे आडवे गेले. तुम्हाला हे पैसे मिळू नयेत म्हणून ठाकरे पवारांच्या महाविकास आघाडीतील नेते कोर्टात गेले आम्हाला म्हणाले कुठून पैसे आणणार आणि आता तुम्हीच तीन हजार रुपयांची देण्याची घोषणा केली तुमच्यासाठी काय आभाळातून पाऊस पडणार आहे का ? असा बोचरा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत सरकार तुमचं येणार नाही हे तुम्हाला माहिती आहे सरकार महायुतीचे येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. मी सगळ्या महाराष्ट्रात फिरतोय लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडका शेतकरी लडका कामगार लाडके ज्येष्ठ हे सगळे केवळ 20 तारखेची मतदानाची वाट पाहत आहेत महायुतीला मतदान करण्याची ते वाट पाहत आहेत.
गुहागरची मक्तेदारी मोडीत काढा
नक्कल करणाऱ्या लोकांची गुहागर मधील मक्तेदारी मोडीत काढत राजेश बेंडल याला आमदार करा नातू साहेब तुमच्या आशीर्वादाने ते नगराध्यक्ष झाले होते,आता तुम्ही त्याला आमदार करा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे माजी आमदार विनय नातू यांचेही खास कौतुक केलं. दापोली साठी योगेश कदम याला विकासवाडी निधी दिला आहे या सगळ्या परिसराच नंदनवन झाल्याशिवाय योगेश कदम स्वस्थ बसणार नाही असे सांगत त्याला तुम्ही आमदार करा त्याला नामदार करण्याची जबाबदारी माझी अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मंत्री दीपक केसरकर या निवडणुकीत राणेसाहेबांच्या साथीने चौकार मारतील तसेच कुडाळ मध्ये निलेश राणे यांचा मोठा विजय होईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभांमधून सांगितलं.
मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पहाल तर आता फाशी
बदलापूर प्रकरणावरून त्या आरोपीला पोलिसांनी बचावासाठी गोळ्या घातल्यावर दोन्ही बाजूने बोलणाऱ्या महाविकास आघाडीच्या दुटप्पी भूमिकेवर शिंदे यांनी टीका केली. आम्ही आता महाराष्ट्रात 25000 महिलांची पोलीस भरती करत आहोत जो हैवान माझ्या लाडक्या बहिणीकडे माकडे नजरेने पाहिल त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुली बाळींकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहता कामा नये हे काम आमचं आहे असेही अभिवचन त्यांनी यावेळी दिले.
मी सीएम नाही तर कॉमन मॅन तुमच्यातला माणूस
हा एकनाथ शिंदे तुमच्यातला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मी कालही कार्यकर्ता आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जे पैशाच्या राशीत होतात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना तुमच्या पंधराशे रुपयांची किंमत काय कळणार असे सुनावत शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आम्ही तिघांनी मिळून जे काही करायचं ते या महाराष्ट्रासाठी करायचं राज्यातले शेतकऱ्यांसाठी माता-भगिनींसाठी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी करायचं या जनतेसाठी करायचे असं सांगत त्यांनी महायुती सरकार लोकाभिमुख योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन समजतो सर्वसामान्य माणूस या राज्यातल्या कॉमनमॅनला ताकद दया असं आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोकणातील भाजपा राष्ट्रवादी या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांच्या कामाचं कौतुक करत त्यांना भरघोस मतांनी निवडून आणा कोकणाला इथल्या विकासाला कोणताही निधी कमी पडू देणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जाहीर सभांमधून दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे जेष्ठ नेते खासदार नारायण राणे, शिवसेना नेते रामदास कदम , मंत्री दीपक केसरकर, शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत, गुहागरचे माजी आमदार भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. विनय नातू, यांचेही खास कौतुक केल.

आणखी वाचा