दापोली, दि. २४ (प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद द्वारा आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये सरस्वती विद्यामंदिर दापोलीने १४ वर्ष मुली गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये गार्गी देशमुख, फरहत रखांगे, शैली तिरपुडे, तिर्था राजशिर्के, विधि महाडिक, प्रतिक्षा केरूळकर, सायमी मोरे, हिरण्या भांबुरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यात आला होता.
तसेच मिरज येथे होण्याऱ्या विभागिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक किर्तीराज नाचरे व क्रीडा शिक्षिका वृषाली कडु या क्रीडा शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उज्ज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष समीर गुजराथी, संचालक महेश सागवेकर, संचालक गजानन दाभोळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सारीका गुजराथी, जनसंपर्क अधिकारी विश्वजित तांबे, समन्वयक वर्षा वानरकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.