दापोली उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर

दापोली, दि. ०६ (प्रतिनिधी) : नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती घेण्याकरिता रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी दुरदृश्यप्रणालीव्दारे जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांची आढावा बैठक घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी, परिविक्षाधीन आय. ए. एस, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शुक्रवार पासुन शासकीय रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करावी तसेच प्रांताधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांची पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गुरुवारीच दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार गुरुवारी रात्री अचानक दापोलीचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सुरक्षा व उपाय योजना यांची पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाचे त्यांनी कौतुक करताना समाधान देखील व्यक्त केले. यावेळी डॉ. चंद्रशेखर गोडकर, इंनटर्न डॉ. निहार पाटिल, परिचारिका साक्षी हांडे, परिचारिका स्नेहल गोपने, परिचारिका स्वप्नाली दाभोळकर, कक्ष सेवक संतोष झिमण, शिकाऊ परिचारिका ऋषिकेश खेडकर, संतोष पावरा, संकेत भोंडकर, स्वरांजली खेडेकर, जागृती झगडे, विनया मुर्चावडे- स्वच्छता कर्मचारी, गौरत सिक्युरिटी आदी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

मात्र दापोलीयात असलेले डॉक्टरांची कमतरता कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे या सगळ्याचा मोठा लोड असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. यापूर्वी अनेकदा दापोली पूजन आहेत नियमित सुरुवात वैद्यकीय अधिकारी दिले जातील असे आश्वासन वारंवार जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलं होत, मात्र अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही त्यामुळे स्त्रीरोग तज्ञ बालरोग तज्ञ आदी अनेक पदे उपजिल्हा रुग्णालयात रिक्त आहेत.

आणखी वाचा