देवरुख नगरपंचायत अग्नीशमन दलाकडून आग लागलेला दगडी कोळसावाहू ट्रक विझवण्यात यश

देवरुख (संगमेश्वर), दि. ०३ (प्रतिनिधी): दाभोळे घाटात रविवार दिनांक ०१ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४.५० च्या दरम्यान दगडी कोळश्याने भरलेलल्या १४ चाकी ट्रकला अचानक आग लागली. KA 28 D7224 हा ट्रक दगडी कोळसा वाहून नेताना दाभोळे येथे ट्रकचा अपघात झाला होता. या ट्रक मध्ये ३० टन दगडी कोळसा होता.
रविवारी सायंकाळी सुमारे ४.५० वा. च्या दरम्यान या अपघात झालेल्या ट्रकला अचानक आग लागली. आगीमुळे धुराचा लोट निघाल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीची माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडून देवरुख नगरपंचायतीला प्राप्त होताच नगरपंचायतीचे अग्नीशमन दल अग्नीशमन वाहनासहीत घटनास्थळी तातडीने पोहचले व अंदाजे अर्धा ते पाऊणतासात पुर्णपणे आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश प्राप्त झाले. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

आणखी वाचा