संगमेश्वर, दि. १६ (वार्ताहर): विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच रंगत आली असुन प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मुसंडी मारली आहे. ओझरे जिल्हा परिषद गटातून मताधिक्य देऊ असा विश्वास शिंदे सेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन मांगले यांनी व्यक्त केला आहे.
कासार कोळवण, खडीओझरे, आंगवली, मारळ, ओझरे, साडवली आदी गावात वाडी वस्त्यावर जाऊन प्रचार चांगली यंत्रणा राबवत आहेत. पालकमंत्री उदय सामंत आणि महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातून प्रचार यंत्रणा चांगली राबवित आहेत. यात शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख प्रमोद पवार उपतालुकाप्रमुख सचिन मांगले, धडाडीचे कार्यकर्ते प्रसाद सावंत, ओझरे विभागप्रमुख नंदु देसाई यांच्यासह शिंदेसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी प्रचारात मुसंडी मारत आहेत.
या ओझरे जिल्हा परिषद गटात चांगला प्रतिसाद मिळत असून महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना शिंदे गटाकडून देखील चांगले लीड देऊ असे उपतालुकाप्रमुख सचिन मांगले यांनी स्पष्ट केले. मांगले हे गेली अनेक वर्ष कासार कोळवण गावचे सरपंच राहिले आहेत.