रत्नागिरी, दि. ११ (प्रतिनिधी): सध्या विधानसभा निवडणूकीची धामधूम चालू आहे, रत्नागिरी मध्ये आता पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार म्हणून श्री. बाळ माने मशाल या निशाणीवर निवडणूक लढत आहेत.
उमेदवार निवडीनंतर नुकत्याच एका पत्रकार परिषदेत दोन उदय एकत्र येतील , व श्री.उदय बने यांच्यावर पक्षात अन्याय झालेचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी म्हटले . वास्ताविक त्यांचा प्रवास राष्ट्रवादी, शिवसेना नंतर शिंदे गट असा राहिलेला आहे . त्यांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला तेव्हा सुद्धा शिवसैनिकांवर अन्यायच झाला होता . मात्र शिवसैनिक नेहमीच पक्षादेश मानतो , मातोश्री चा आदेश हा प्रत्येक शिवसैनिकांना शिरसावन्द्य असतो . त्याच्याच प्रत्यय म्हणून ४००० , ८००० या मताधिक्याने निवडून येणारे शिवसेना प्रवेशानंतर ४५०००+ मताधिक्याने निवडून आले.
ही शिवसैनिकांची ताकद आहे. तेव्हा सुद्धा पक्षाचे तालुकाप्रमुख श्री. बंड्या साळवी यांना पक्षातर्फे एबी फॉर्म देण्यात आला होता. तेव्हासुद्धा त्यांच्यावर अन्यायच झाला होता .परंतु पक्षादेश मानत सर्व शिवसैनिकांनी मोठ्या फरकानी निवडून आणले . त्याच शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्याचे काम शिवसेनेेच्या १० वर्षाच्या कालावधीत करण्यात आले. पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून शिंदे गटात सामील झाले . केवळ मंत्रिपद , त्यातून पैसा मिळवणे व मिळालेल्या पैशातून परत सत्ता मिळवणे . प्रत्येक कार्यकर्ता , पदाधिकारी यांना पैशाचे आमिष दाखवून , ई डी आदी यंत्रणाचे भय दाखवून आपले काम करण्यास भाग पाडणे. हेच गेली २० वर्षे चालू आहे . निकृष्ठ रस्ते , अपघात , बेरोजगारी , कंपन्या बंद , पाणी प्रश्न , सांडपाण्याचा प्रश्न , घनकचरा प्रकल्प , तरुण पिढीची व्यसनाधीनता , ज्येष्ठ नागरिक , पेन्शनधारक यांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करता येईल .
त्या पत्रकार परिषदेमध्ये श्री.उदय बने यांच्या बाबतीत खूप काळजी असल्याचे दाखवण्यात येत होते . परंतु उदय बने यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचे कोणी प्रयत्न केले , हे देखील शोधले पाहिजे. ज्या उद्धव साहेबांनी पक्षाची उमेदवारी , पक्षाचे उपनेतेपद , म्हाडाचे अध्यक्षपद, पुन्हा उमेदवारी , मंत्रिपद असे सर्वकाही दिले त्याच पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत नेहमीच टीका करताना हिरीरीने अग्रभागी असतात. जे देशाचे आदरणीय नेते श्री.शरद पवार साहेब , श्री.उद्धव ठाकरे साहेब यांचे झाले नाहीत ते श्री.एकनाथ शिंदे यांच्या सोबत तरी प्रामाणिक राहतील का ? हा खरा प्रश्न आहे .
श्री.उदय बने यांना शाखाप्रमुख , उपतालुकाप्रख , तालुकाप्रमुख , जिल्हाप्रमुख अशी पक्षाची अनेक पदे त्याच बरोबर ५ वेळा जिल्हा परिषद सदस्य , सभापती , उपाध्यक्ष अशी पदे देऊन सन्मानित केले आहे . रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी श्री.उदय बने यांचे महत्वपूर्ण योगदान आहे हे कोणीही नाकारु शकत नाही. श्री.उद्धव ठाकरे यापुढे देखील त्यांचा यथोशीत सन्मान नक्कीच करतील . श्री.उदय बने हे सुद्धा फॉर्म मागे घेऊन शिवसेना पक्षप्रमुख यांनी दिलेला उमेदवार निवडीत महत्वाची भूमिका पार पाडतील. परंतु त्यांच्या विषयी गैरसमज पसरवण्याचे काम विरोधक करत आहेत , हे दुर्दैवी आहे. सर्व शिवसैनिक व मायबाप जनतेने या सर्व बाबीचा विचार करून मशाल या निशाणी समोरचे बटण दाबून न्याय दयावा , ही विनंती.








