‘रुस्तुम ए हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’ हे किताब बेकायदेशीर वापरण्यावर होणार कारवाई

नवी दिल्ली, दि. १३ (प्रतिनिधी): भारतातील कुस्तीला खोट्या किताबामुळे उतरती कळा लागली आहे. भरपूर खोट्या संघटना खोट्या किताबांचे आयोजन करून लोकांची फसवणूक आहेत.  भारतीय शैली कुस्ती महासंघ ISWA गेली ६८ वर्षे  ‘रुस्तुम ए हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’ ह्या स्पर्धांचे आयोजन करत आहेत. या तीनही किताबांचे शासकीय नोंद असलेले ट्रेडमार्क आणि कोर्टाची ऑर्डर भारतीय शैली कुस्ती महासंघाकडे आहेत.

५ नोव्हेंबर २०२४ रोजी पंजाब राज्यात नवांशहर जिल्ह्यात “रुस्तम-ए-हिंद कुस्ती संघटनेने” कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ‘रुस्तुम ए हिंद’ हे नाव वापरले आहे. याठिकाणी महाराष्ट्राचा पैलवान सिकंदर शेख यास “रुस्तम-ए-हिंद कुस्ती संघटनेने” बेकायदेशीरपणे विजेता घोषित केले आहे.

 संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष जितेंदर राठी यांनी बोलताना सांगितले कि, ‘रुस्तुम ए हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’  किताबामुळॆ सरकारी नोकरी, शासकीय पेन्शन योजना आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेता येतो. पण काही बनावट संघटना आणि पैलवान याचा गैरवापर करत आहेत. जे लोक आमच्या किताबाचे नाव स्वतःच्या नावापुढे वापरून समाजात खोटा नावलौकिक मिळवत आहेत. अशा लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे.
 गौरव सचदेवा यांनी बोलताना सांगितले कि, आमचे  ‘रुस्तुम ए हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’  हे  ट्रेडमार्क परवानगीशिवाय वापरणे हे ट्रेडमार्क उल्लंघन आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यासाठी कायदेशीर कारवाईचीही तरतूद आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ (इंडिया) ISWA. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आता कायदेशीर सल्लागारांची चर्चा करत असून लवकरच सर्वाना आम्ही कायदेशीर नोटीस पाठविणार आहे.

आणखी वाचा