कुवारबाव ब्राह्मण पंचक्रोशी सभा आयोजित पाककला स्पर्धेत अपर्णा पाष्टे, सुप्रिया आठल्ये प्रथम

रत्नागिरी, दि. ११ : कुवारबाव ब्राह्मण पंचक्रोशी सभेमार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. नाचणे येथील गोखले भवन येथे झालेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिपळूण, पूर्णगड व रत्नागिरी परिसरातील एकूण ६५ महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.

स्पर्धेत दोन वेगवेगळ्या गटांमध्ये पदार्थ बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. पौष्टिक पराठा बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. अपर्णा पाष्टे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक सौ. प्रज्ञा फडके यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक सौ. रोहिणी गुण्ये यांनी मिळवला. या गटात उत्तेजनार्थ क्रमांक सौ. मिहिका कार्लेकर यांना देण्यात आला.

तसेच रव्याचे पाकातील लाडू बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. सुप्रिया आठल्ये यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक सौ. सुप्रिया पाटणकर यांनी, तर तृतीय क्रमांक सौ. स्पृहा आठल्ये यांनी मिळवला. या गटात उत्तेजनार्थ क्रमांक सौ. रोहिणी गुण्ये यांनी पटकावला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने झाली. स्वागतपर भाषण सौ. अदिती भावे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. अर्चना जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन रवींद्र रानडे, श्री. गानू, सौ. अनुजा आगाशे तसेच परीक्षक सौ. शीतल पटवर्धन आणि सौ. ऋता पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वर्मोर सोल्युशन्स कंपनीच्या उत्पादनांची माहिती श्रीमती सेजल आणि स्वरश्री जोगळेकर यांनी उपस्थितांना दिली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना संस्थेतर्फे सहभागाबद्दल भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच परीक्षकांनी स्पर्धकांना पाककलेविषयी उपयुक्त मार्गदर्शन करून त्यांचे कौतुक केले.

स्पर्धकांना परीक्षकांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. शमा प्रभुदेसाई यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष अनंत आगाशे, रवींद्र रानडे, श्री. गानू, सौ. तेजा मुळ्ये आणि देवदत्त पेंडसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौ. अनुजा आगाशे, सौ. भाग्यश्री गानू, सौ. राधा रानडे, सौ. श्रद्धा सिध्ये, सौ. श्रेया रानडे, सौ. अर्चना जोशी, सौ. मानसी अभ्यंकर, सौ. पूर्वा साने, सौ. श्रद्धा पटवर्धन, सौ. उर्मिला पटवर्धन, सौ. शमा प्रभुदेसाई, सौ. करकरे, सौ. स्नेहा बीजर्गी, सौ. श्रद्धा जोशी, सौ. पौर्णिमा पेंडसे आणि सौ. अदिती भावे यांनी मोलाचे सहकार्य केले.

आणखी वाचा