रत्नागिरी, दि. ०२ : ॲम्याचुर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, महाराष्ट्र लगोरी संघटनेच्या वतीने आठव्या ज्युनिअर (एकोणीस वर्षा खालील )राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट सावर्डे, चिपळूण,महाराष्ट्र येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडली. या स्पर्धेत भारतातील २१ राज्यातून १८ मुलांचे व २० मुलींचे संघ असे साधारण ६२० खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन भोजपुरी अभिनेता, फायटर मास्टर प्रिंस मिश्रा व श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्टचे पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ.आर एच देशपांडे यांच्या हस्ते लगोरीचे जनक स्व.संतोष गुरव सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन करून तसेच लगोरी फोडून करण्यात आले. यावेळी लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदीप गुरव, श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे संचालक श्रीकांत पराडकर,लगोरी संघटनेचे पदाधिकारी ॲड.प्रिया गुरव, तुषार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
स्पर्धा चालू होण्यापूर्वी सहभागी राज्यातील संघांनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली व स्व. संतोष गुरव यांना श्रद्धांजली वाहून खेळाडूंनी सामूहिक शपथ घेतली.ह्या स्पर्धा युट्यूब वर थेट लाईव्ह प्रसारण केल्याने लगोरीचा थर्ररार हा सर्वांना अनुभवाला मिळाला यात सहभागी सर्वं राज्यांचे सामने हे रोमांचक व अटीतटीचे झाले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्य अतिथी म्हणून श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापकीय विश्वस्त विलास वालावलकर ह्यांच्या उपस्थितीत व भारतीय लगोरी संघटनेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. संदीप गुरव, भोजपुरी अभिनेता फायटर मास्टर प्रिंस मिश्रा, श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्टचे संचालक श्रीकांत पराडकर,महाराष्ट्र लगोरी संघटनेचे सचिव भरत गुरव, भारतीय लगोरी संघटनेचे पदाधिकारी तसेच बिहार लगोरी संघटनेचे रंदिर कुमार, गोवा लगोरी संघटनेचे सचिव तन्वेश वेंगूलेंकर, हरियाणा लगोरी संघटनेचे सचिव जयवीर दुडी,आसाम लगोरी संघटनेचे सचिव रितू ,अरुणाचलप्रदेशचे सॅनडी चॅरी व सहभागी सर्वं राज्यांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
विलास वालावलकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले कि हि भव्य दिव्य राष्ट्रीय लगोरी स्पर्धा बघून व एवढे भारतभरातील सहभागी २१ राज्ये बघून मी पूर्ण भाराहून गेलो. मी हि लहानपणी हा खेळ खेळायचो आज हा खेळ आज संपूर्ण भारतात खेळला जातोय याचे कौतुक आणि आश्चर्य वाटत आहे, लगोरी हा खेळ शारीरिक संतुलन अबाधित राखण्यासाठी सर्वोत्तम असा नक्कीच आहे. मात्र, आजची पिढी संगणक आणि मोबाईलच्या खेळात गुरफटत चालली असल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे. आताच्या संगणकीय युगात अनेक पारंपारिक खेळ नामशेष होत चालले असताना लगोरी सारख्या देशी खेळाला संतोष गुरव यांनी संजीवनी देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पुन्हा कधीही आपण आपल्या लगोरीच्या राज्य व राष्ट्रीय लगोरी स्पर्धा येथे घ्या आम्ही आपणांस आमच्या ट्रस्ट च्या वतीने सर्वोतपरी सहकार्य करू असे अशी ग्वाही संदीप गुरव यांना दिले.
स्पर्धेत मुलांच्या गटात गोवा संघाला विजेते पद, तर उपविजेतेपद महाराष्ट्, तर तृतीय स्थान बिहार व झारखंड संघाला मिळाले.
मुलींमध्ये हरियाणा संघाने सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद मिळविले तर उपविजेतेपद गोवा संघाने मिळविले तर तृतीय स्थान बिहार व उत्तराखंड संघाला मिळाले.
मुलांमध्ये बेस्ट प्लेयर अवॉर्ड हरियाणा मधील अमन कुमार याला तर मुलींमध्ये बिहार मधील काजळ यांनी पटकावले.
टार्गेट टीम लगोरी प्रकारात अरुणाचल प्रदेश संघाला विजेते पद, तामिळनाडू संघाला उपविजेतेपद, तर तृतीय स्थान पॉंडिचेरी संघाने मिळवले तर मिक्स डबल मध्ये कर्नाटक व उपविजेतेपद आसाम संघाने तर तृतीय स्थान दिल्ली संघाने मिळविले.
या स्पर्धेतून निवडलॆला मुले व मुलींचे संघ सप्टेंबर मध्ये थायलँड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यास मोलाची भूमिका बजावलेले पंच संतोष नाईक,निकिता नाईक, मेहबूबसाद ताशिलदार,रितेश गवस,महेश जाधव,लक्षिता कवळेकर,नारायण गावडे,आकाश राऊत,सुकन्या नाईक,अमीषा लोक्रे, बिरापान बसुमतारी,पिंकी भरलुवा, दिनेश्वर बरो,दीपांकर काचारी, शिवम कुमार, जितेंद्र कुमार ,फुलटूष कुमार ,अजय सिंह शेखावत, मुख्य रेफरी म्हणून भरत गुरव आणि राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले अश्या सर्वं पंचाचा सहभागी राज्यातील संघ व्यवस्थापक,प्रशिक्षक यांना हि सन्माचिन्ह व टीशर्ट मान्यवरांकडून देवून सन्मानित करण्यात आले.








