बालविवाह थांबवण्याची काळाची गरज- माधवी जाधव (संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास)

चिपळूण, दि. २७ (प्रतिनिधी): बालविवाह करण्याचे दुष्परिणाम आपण सगळे जाणतो तरीही बालविवाह अजूनही होत आहेत पूर्णतः बंद नाही झाले आहेत किमान वयापेक्षा मुलीचे लग्न करुन देण, प्रथा, रुढी परंपरा या शृंखलेत अडकलेल्या महिलांची, मुलींची स्थिती फारशी सुधारली नाहीय असे म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही. वाढता हिंसाचार, अत्याचार या सगळ्याच बाबी पाहता अजूनही मुली महिला सुरक्षित नाही आहेत हे वेगवेगळ्या गोष्टींमधून समोर येत आहेच. यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालविवाह.
बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ या कायद्याअंतर्गत विवाह करणाऱ्या किंवा करार करणाऱ्या पक्षातील कोणीही बालक नसेल वयोमार्यदा २१ वर्षे मुलगा आणि १८ वर्षे मुलगी पूर्ण नसतील तर सदर विवाह हा बालविवाह असेल. बालविवाह त्याचे दुष्परिणाम शारीरिक, मानसिक दृष्ट्या मुलीच्या आयुष्यात दूरगामी परिणाम करते.
बालविवाह रोखणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, अशी माहिती माधवी जाधव (संरक्षण अधिकारी चिपळूण, महिला व बालविकास विभाग) यांनी दिली व बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा.. आज बालविकास प्रकल्प सेवा योजना २ येथे असूर्डे बिट अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका रेखा कांबळे मॅडम, समुपदेशक पूनम प्रभावळे पल्लवी सुपेकर यांच्या उपस्थितीत झाली.

आणखी वाचा