नाटेकर कला, गांधी वाणिज्य व कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न

रत्नागिरी, दि. १९ : भारत शिक्षण मंडळ संचलित पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला कै.सौ विजयालक्ष्मी (गोदूताई) श्रीकृष्ण( नाना )गांधी कनिष्ठ वाणिज्य व श्रीमान रमेशजी कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या जयंती दिवसानिमित्त साजरा करण्यात येणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ अतिशय उत्साहात संपन्न झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र कांबळे व पर्यवेक्षक श्री. मनोज जाधव यांच्या प्रेरणा व प्रोत्साहनामुळे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ संपन्न झाला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक उत्सवानिमित्त शिवछत्रपतींची पुस्तके वाचण्याचा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी केला. ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम- एक आदर्श व्यक्तिमत्व’ या विषयावर मराठी विभाग प्रमुख सौ. मानसी चव्हाण यांनी व्याख्यान दिले.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी त्यांच्या विविध पुस्तकांचे वाचन करण्यात आले. डॉ. कलामांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथालयास भेट देण्यात आली. त्यासाठी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे वाचन व प्रत्यक्ष ग्रंथांची हाताळणी विद्यार्थ्यांनी केली. श्रीम. रमाबाई रानडे , श्रीम.लक्ष्मीबाई टिळक, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज , थोर पुरुषांची आत्मचरित्रे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी. थोर महापुरुषांची पुस्तके विद्यार्थ्यांनी पाहिली व वाचली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या बहु असोत सुंदर.

या महाराष्ट्र गौरवगीताचे तालबद्ध पद्धतीने गायन करून कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमात सर्वांचे आभार श्रीम. मालन तांबोळी यांनी मानले. महाराष्ट्र गौरवगीताचे तालबद्ध पद्धतीने गायन करून कार्यक्रमाचा समारोप झाला. सर्व अध्यापक वर्गाचे उत्तम सहकार्य’ वाचन प्रेरणा दिनासाठी’ लाभले .अत्यंत उत्साहात ‘वाचन प्रेरणा दिन ‘संपन्न झाला.

आणखी वाचा